esakal | सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?
sakal

बोलून बातमी शोधा

सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणं ही तर खूप सामान्य गोष्ट झाली आहे.

सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणं ही तर खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र बऱ्याच काळ मास्क लावून ठेवल्यानं ऑक्सिजनची कमतरता किंवा हायपोक्सिया होण्याची शक्यता आहे? 

सोशल मीडियावर काही यूजर्संनी याबाबतचा दावा केला आहे. हल्लीच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे की, जास्तवेळ मास्कचा प्रयोग केल्यानं हायपोक्सिया होऊ शकतो. हायपोक्सिया होण्याची अशी एक स्थिती असते. ज्यात संपूर्ण मानवी शरीर किंवा शरीरातील एका भागात पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नाही. 

व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, आपण मास्कच्या आतमध्ये वारंवार श्वास घेतो. बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्सिइड पुन्हा श्वासाद्वारे पुन्हा आतमध्ये जातो आणि आपल्याला चक्कर येण्यास सुरुवात होते. सोशल मीडिया यूजर्स ही पोस्ट व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवर शेअर करत आहे. मुळात हा लेख नायजेरियन वेबसाईट Vanguard पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या लेखात दावा केला आहे की, चेहऱ्यावर दीर्घकाळापर्यंत     मास्कचा वापर केल्यास त्याचा परिणाम हे होतो की, व्यक्तीनं सोडलेला कार्बन डायऑक्सिइडच पुन्हा श्वासाद्वारे आतमध्ये घेण्यास सुरुवात करतो. ज्यामुळे आरोग्यास त्रास होऊ शकतो. 

एका इंग्रजी वृत्तसमूहाच्या अँटी फेक न्यूज वॉर रुम (AFWA) नं म्हटलं की, हा दावा दिशाभूल करणारा आहे. फेस्क मास्कचा वापर केल्यास हायपोक्सिया होत नाही आणि त्याचा मेंदू किंवा हृदयावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. दरम्यान फेस मास्क आणि चष्मा जर का अधिक घट्ट आणि जास्त काळ लावून ठेवल्यास डोकेदुखीसारखी समस्या उद्भवू शकते. 

कोरोनामुळे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन

फेसबुक ग्रुप 'Senior Advocates Of Matrimony' मध्ये 'Toni Tega Epapala' यानं पहिल्यांदा ही पोस्ट शेअर केली होती. मात्र त्यानंतर त्यानं ती डिलीट केली. त्यांच्या पोस्टचं अर्काइव येथे बघू शकतो. फेसबूकवर बऱ्याच यूजर्सनं ही पोस्ट शेअर केली आहे. 

व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबद्दल प्रसिद्ध फिजीशियन आणि नेफ्रॉन इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉक्टर संजीव बगाई यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केलं की, जर का मास्कचा उपयोग दीर्घकाळासाठी करावा लागत असेल तर ते पूर्णतः सुरक्षित आहे. 

डॉक्टर संजीव यांच्यानुसार, खोकला किंवा शिंका यापासून निघणारी डॉपलेटमुळे होणाऱ्या संक्रमणापासून आपला बचाव करण्यासाठी मास्क तुम्हाला मदत करते. मात्र ज्या मास्कमधून जर श्वास कोंडत असेल तर तसा मास्कचा वापर करणं टाळावं. मास्क हा योग्य आकार आणि योग्य बनावटीचा असायला हवा. मास्क चेहऱ्यावर इतकाही घट्ट असू नये की लावणाऱ्याला अस्वस्थ वाटेल. 

व्हायरल पोस्टमध्ये N-95 मास्क, सर्जिकल मास्क किंवा कोणत्याही विशेष प्रकारच्या मास्कचा उल्लेख केला नाही आहे. विचार करण्यासारखी बाब म्हणजे, N-95 मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) चा भाग आहे. जो संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वापर करतात. 

स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटीच्या इंजिनिअरर्संनी एक नव्या प्रकारचा प्रोटेक्टिव्ह फेस मास्क विकसित केला आहे. जो जे ऑक्सिजनसारख्या अभावाच्या दुष्परिणामांपासून बचाव करेल.

मुंबईकरांनो कोरोनाबाबत एक उत्तम बातमी , नीती आयोगानं केला खुलासा...

स्टॅनफोर्डच्या या प्रोजेक्टमध्ये कामम करत असलेले रिसर्चर जॉन शू यांच्यानुसार, N-95 मास्कबद्दल असा अंदाज आहे की, या मास्कमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 5 ते 20 टक्क्यांपर्यत कमी करतो. याचा परिणाम निरोगी माणसावरही होऊ शकतो. यामुळे चक्कर आल्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर आपण बराच काळ मास्क घातला तर यामुळे फुफ्फुसांचंही नुकसान होऊ शकते. श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या रुग्णाचाही जीव धोक्यात येऊ शकतो.

अपोलो हैदराबादचे सीनिअर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांच्यानुसार, व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये कोणतंही सत्य नाही आहे. त्यांनी म्हटलं, वास्तविक, ज्या व्यक्तीने हे पोस्ट शेअर केली आहे त्याचा हा खोडकरपणा दिसत आहे. आपल्या सर्वाना चांगल्याप्रकारे माहित आहे की, फेस मास्क कोरोना व्हायरस आणि इतर श्वसन संक्रमणांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. अशा प्रकारच्या पोस्ट जनतेला फेस मास्क वापर न करण्यास परावृत्त करु शकतात.

डॉक्टर कुमार यांनी पुढे म्हटलं की, फेस मास्कचा उपयोग केल्यास हायपोक्सिया होत नाही आणि त्याचा मेंदू किंवा हद्याचं कार्य करण्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यांनी निश्चितपणे हे सांगितलं आहे की, जर चेहऱ्यावरील मास्क आणि चष्मा घट्ट असेल, तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी जास्त काळ मास्क लावून ठेवल्यास डोकेदुखी किंवा चेहरा दुखणे अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. 

अनागोंदी कारभाराची हद्द ! धारावीतल्या पॉझिटिव्ह कुटुंबाला सोडलं घरी सोडले घरी आणि पुढे जे घडलं...

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) किंवा युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अण्ड प्रिव्हेंशन(CDC)यांनी देखील दीर्घकालीन मास्क लावण्याबाबत कोणताही इशारा दिला नाही आहे. 

म्हणूनच, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपण असे म्हणू शकतो की कपडे आणि विना वाल्व बनलेले सामानय मास्कचा दीर्घकाळापर्यंत उपयोग केला जाऊ शकतो. जो पूर्णपणे सुरक्षित आहे. फेस मास्क हा योग्य साइज आणि योग्य बनवटीचा असला पाहिजे. जेणेकरून तो लावल्यावर अस्वस्थ वाटू नये.

तज्ञांच्या मते, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ एकच मास्कचा वापर करणं टाळावं. कारण काही काळानंतर मास्कमधील प्रभावीपणा कमी होतो. या सल्ल्यामागेही ऑक्सिजनचा कमतरता जाणवणं असं कोणतंही कारण नाही आहे.

using mask for longer time causes hypoxia and impact on health fact check

loading image
go to top