भिवंडीत २७ वर्षीय तरुणाची खाडीत उडी मारुन आत्महत्या

पूजा विचारे
Tuesday, 14 July 2020

भिवंडीत एका २७ वर्षीय तरुणानं खाडी पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. कशेळी खाडी पुलावरुन उडी मारुन या तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे.

मुंबईः  भिवंडीत एका २७ वर्षीय तरुणानं खाडी पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. कशेळी खाडी पुलावरुन उडी मारुन या तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे. राहुल संदीप जोशी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. राहुल हा बांगर नगर, काल्हेर येथील रहिवासी आहे.  नारपोली पोलिसांनी ठाणे अग्निशामक दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. 

राहुल हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करायचा. लॉकडाऊनच्या काळात काम बंद असल्यानं तो घरीच होता. गेल्या एक महिन्यांपासून त्याच्या स्वभावात बरेच बदल झाले होते. तो बराच चिडखोर झाला होता. त्यामुळे तो मानसोपचार तज्ञांकडून उपचारही घेत होता, अशी माहिती राहुलची बहिण नेशा जोशी यांनी दिलीय. आताच त्याच्या गोळ्या संपल्यानं तो रागात घरातून बाईक घेऊन आपला मित्र समीर याच्या घरी गेला होता. समीरह हा कशेळी येथे राहतो. 

त्यावेळी राहुलला घरी आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्याशी संपर्क साधला आणि ते समीरच्या घरी गेले. पण त्यावेळी राहुलनं घरी येणार नाही, असं सांगितल्यानं त्याचे वडील पुन्हा घरी निघून आले. मी कुठे आहे हे कुटुंबाला समजल्याचा राग आल्याने राहुलने मोबाईल आपटल्याचं त्याचा मित्र समीर घरी येऊन सांगितलं. त्यानंतर जे घडले ते खूपच धक्कादायक होतं. 

या सर्व घटनेनंतर  राहुलचे वडील हे कामासाठी ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना खाडीपुलावर गर्दी दिसली आणि त्या ठिकाणी आपल्या मुलगा राहुलची बाईक आढळून आली.  नागरिकांनी माहिती दिल्यावर ही घटना त्याच्या वडिलांना आणि कुटुंबियांना समजली.

अधिक वाचाः  नवी मुंबई महापालिका आयुक्तांची पुन्हा बदली, नव्या आयुक्तांनी स्विकारला पदभार

स्थानिक नागरिकांसह ठाणे अग्निशामक दलाच्या जवानांनी खाडी पत्रात राहुलचा शोध घेतला असता तो आढळून न आल्याने सायंकाळी शोध मोहिम थांबवण्यात आली आहे. दरम्यान नारपोली पोलिसांनी त्याच्या बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल केलीय.

काही दिवसांपूर्वीच वांद्रे-वरळी सी लिंकवर एका 25 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली होती. सी लिंकवरुन उडी मारुन या तरुणानं आपलं जीवन संपवलं. केवल कासले अशी मृत तरुणाचं नावं होतं. हा तरुण बाईकनं सी लिंकवर गेला. तिथे त्यानं आपली गाडी पार्क केली आणि नंतर पाण्यात उडी मारली. 

हेही वाचाः  ...आता बस्स झाले लॉकडाऊन! 'या' शहरातील व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात...

मुंबई महाविद्यालयातून कासलेनं आपलं कॉमर्स विषयात गॅज्युएशन पूर्ण केलं आहे. ५७ वर्षीय त्याचे वडील बीएमसीमध्ये कर्मचारी आहेत. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढच्या वर्षी कासले वडिलांच्या जागी नोकरीला लागणार होता. 

27 year old boy jump from khadi bridge bhiwandi

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 27 year old boy jump from khadi bridge bhiwandi