मुंबईत गेल्या 24 तासात 2,714 कोरोनामुक्त! रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्‍क्‍यांवर

मिलिंद तांबे
Sunday, 18 October 2020

मुंबईत आज 1,600 रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,41,939 झाली आहे.

मुंबई : मुंबईत आज 1,600 रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,41,939 झाली आहे. मुंबईत आज 49 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 9,731 वर पोचला आहे. मुंबईत आज 2,714 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 2,10,814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्के इतका झाला आहे. 

युरोपात घुमले वसईचे सुर, भावाच्या लग्नात बहिणीची अनोखी भेट

रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात 12,415 अतिजोखमीच्या व्यक्ती आल्या आहेत. त्यामुळे कोविड केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आज कोविड केंद्र 1 मध्ये 1,063 अतिजोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 646 इमारती आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,406 इतकी आहे. 
मुंबईत आज नोंद झालेल्या 49 मृत्यूंपैकी 34 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 42 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. एकूण मृत झालेल्या 49 पैकी 18 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. 31 रुग्णांचे वय 60 वर्षांच्या वर होते. 

आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेचा वापर करून अमेरिकन गांजाची तस्करी; टोळक्‍याचा पर्दाफाश

आज 2,714 रुग्ण बरे झाले. आजपर्यंत 2,10,813 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 87 दिवसांवर गेला आहे. 17 ऑक्‍टोबरपर्यंत एकूण 13,54,182 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 11 ते 17 ऑक्‍टोबरदरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.77 इतका आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2714 corona free in last 24 hours in Mumbai The patient's recovery rate is 87 percent