आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेचा वापर करून अमेरिकन गांजाची तस्करी; टोळक्‍याचा पर्दाफाश

अनिश पाटील
Sunday, 18 October 2020

आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेचा वापर करून अमेरिकन गांजाची तस्करी करणाऱ्या टोळक्‍याचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे.

मुंबई ः आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेचा वापर करून अमेरिकन गांजाची तस्करी करणाऱ्या टोळक्‍याचा पर्दाफाश करण्यात केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. लोणावळा पोस्ट ऑफिस येथून हे पार्सल जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक हजार 110 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. 

मार्वे बीच, मालवणीतील खारफुटींवर अवैध भराव; पर्यावरणवाद्यांची पोलिसांत तक्रार 

श्रीनय शहा (26) व ओमकार तुपे (28) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शहा हा अहमदाबाद, तर तुपे हा नवी मुंबईतील नेरूळ येथील रहिवासी आहे. दोघांकडून 74 ग्रॅम कुरेटेड गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यापूर्वी पार्सलमधून 1036 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. या एकूण मालाची किंमत 55 लाख रुपये असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. हा गांजा कॅनडावरून आला असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. हा गांजा मुंबईत पाठवण्यात येणार होता. 

युरोपात घुमले वसईचे सुर, भावाच्या लग्नात बहिणीची अनोखी भेट

परदेशातील गांजा येथील रेव्ह पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो. विशिष्ट खते व तंत्रज्ञानाच्या मदतीने तो उगवण्यात येतो. त्यामुळे तो चांगल्या प्रतीचा असतो. तसेच या गांजावर टीएचसीसारख्या रासायनिक द्रव्याचा वापर केला जातो. त्यामुळे सामान्य गांजापेक्षा त्याची नशा अधिक असते. त्यामुळे भारतीय बाजारात एक पुडी पाच हजार रुपयांपर्यंत विकली जाते. अटक आरोपी शहा हा वितरक असून तुपे त्याच्याकडून अमली पदार्थ खरेदी करत असल्याचा संशय आहे. 
-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smuggling of American chemical using international courier services