esakal | स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, राज्य परिवहन महामंडळातील २८ हजार कर्मचारी होणार कमी ?
sakal

बोलून बातमी शोधा

स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, राज्य परिवहन महामंडळातील २८ हजार कर्मचारी होणार कमी ?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात इतर १४ राज्यांच्या तुलनेत एका बसमागे अधिक कर्मचारी काम करत असल्याची बाब समोर आली आहे.

स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, राज्य परिवहन महामंडळातील २८ हजार कर्मचारी होणार कमी ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : अगदी काहीच दिवसांपूर्वी ST महामंडळ आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार अशी बातमी समोर आली होती. मात्र स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली आणि ST महामंडळ कुणालाही नोकरीवरून कमी करणार नसल्याचं सांगितलं. 

दरम्यान आता आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात इतर १४ राज्यांच्या तुलनेत एका बसमागे अधिक कर्मचारी काम करत असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात एका बसमागे सहापेक्षा अधिक कर्मचारी आहेत. इतर १४ राज्यात एका बसमागे पाचच कर्मचारी आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य परिवहन महामंडळाने एक महत्त्वाचा प्रस्ताव तयार केलाय अशी माहिती समोर येतेय आहे. 

मोठी बातमीमातोश्रीवर कोरोनाची पुन्हा धडक! तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाईन...

क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाल्यानं ST महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. राज्य परिवहन मंडळाने हा प्रस्ताव तयार केला असून आता हा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात येणार असल्याचंही समजतंय. असं झालं तर राज्य परिवहन महामंडळातील तब्बल २८ हजार लोकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. 

कसं आहे सरकारकडे पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावाचं स्वरूप ? 

  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५० वर्ष आणि त्यापुढील कर्मचाऱ्यांना VRS म्हणजेच स्वेच्छा निवृत्ती दिली जाणार आहे. 
  • यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे पगाराचे दरमहा शंभर कोटी वाचणार आहेत 
  • स्वेच्छा निवृत्ती म्हणजेच VRS साठी तब्बल चौदाशे कोटी रुपयांचा निधी राज्य परिवहन महामंडळाला खर्च करावा लागेल
  • सरकारकडून हा निधी उपलब्ध करून दिला तरच हा निर्णय घेतला जाणारा आहे  
  • राज्य परिवहन महामंडळात सध्या २८ हजार लोकं ही ५० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाची आहेत. 

मोठी बातमी  - तब्बल 14.82 कोटींचा मामला, मुंबई पोलिस विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशन येणार आमनेसामने?

कोरोनामुळे ST महामंडळाचं कंबरडं मोडलंय. तब्बल तीन महिने राज्य परिवहन महामंडळाची सेवा ठप्प आहे. कोरोनामुळे केवळ १० टक्के बसेस रस्त्यावर आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाकडे येणारं उत्पन्नही कमालीचं घटलंय. दिवसाला २२ कोटी उत्पन्न असलेल्या ST ला दिवसाला केवळ वीस लाख उत्पन्न येतंय. गेल्या महिन्यातील निम्म्या पगारानंतर सध्याच्या कठीण परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नाहीयेत. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सरकारकडे ४८० कोटी रुपयांची मागणी केलीये. 

28 thousand state transport corporation employees will get VRS ST made one proposal for government 

loading image
go to top