Mumbai : मुंबईतील ३ मोठ्या प्रकल्पांना महापुरुषांची नावे द्यावी; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
3 big projects in Mumbai should named legends Letter from Devendra Fadnavis to CM eknath shinde
3 big projects in Mumbai should named legends Letter from Devendra Fadnavis to CM eknath shinde

मुंबई : मुंबईतील प्रगतीपथावर असणाऱ्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, १६ मार्च २०२३ रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत त्यांनी यावेळी शेअर केली. या पत्रात तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना महापुरुषांची नावे देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये , मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यापैकी मुंबईतील कोस्टल रोडला आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्याचबरोबर या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com