esakal | अन्न-पाण्याविना 'ते' सोडतायेत जीव; सुरक्षा रक्षकाला अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

अन्न-पाण्याविना 'ते' सोडतायेत जीव; सुरक्षा रक्षकाचेही डोळे पाणावले

उल्हासनगर येथील चांदीबाई महाविद्यालय परिसरात झाडावर घर करून राहणाऱ्या तब्बल 30 कावळ्यांचा अन्न-पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

अन्न-पाण्याविना 'ते' सोडतायेत जीव; सुरक्षा रक्षकाला अश्रू अनावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात उपासमारीचे जीवन जगणाऱ्या गोरगरिबांना अन्न-धान्य साठा पुरवण्यासाठी अनेक संघटना, संस्था, आजी माजी नगरसेवक, समाजसेवक, दानशूर मंडळी पुढे येत आहेत. मात्र, उल्हासनगर येथील चांदीबाई महाविद्यालय परिसरात झाडावर घर करून राहणाऱ्या तब्बल 30 कावळ्यांचा अन्न-पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई महापालिकेकडून डायलिसीससाठी पाच केंद्रे  

सिमेंट कॉंक्रीटचे जंगल झालेल्या उल्हासनगरात घनदाट वृक्षांचा अभाव आहे. मात्र, चांदीबाई महाविद्यालय प्रशासनाकडून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी निसर्गरम्य वातावरण असून, त्यावर पक्षांचा किलबिलाट व कावळ्यांच्या काव-कावचा आवाज कानावर पडत होता. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी झाडाच्या सावलीत बसून घरचे आणलेले जेवण करत होते. उरलेले काही अन्न ते या पक्षांना-कावळ्यांना टाकत होते. 

ही बातमी वाचली का? मुंबईतील भाजी मार्केट बंद होणार

याशिवाय समोरच उल्हासनर रेल्वे स्थानकाचा स्कायवॉक असून, त्याच्या कोपऱ्यावर पक्षीप्रेमी बिस्कीट-शेव-धान्य टाकत होते. विशेषतः कावळे त्यावर ताव मारून पुन्हा महाविद्यालय परिसरातील झाडांवरील घरट्यात येत होते. मात्र, प्रथम संचारबंदी व नंतरच्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आले. तर लोकल ट्रेन धावत नसल्याने स्कायवॉकचा वापरही बंद आहे. त्यामुळे अन्न-पाण्यावाचून तडफडून येथील कावळे जीव सोडत असल्याची माहिती पाणावलेल्या डोळ्यांनी सुरक्षा रक्षकाने दिली. 

loading image
go to top