बाप्पाच्या गावात 30 लाख मूर्ती तयार

नरेश पवार
गुरुवार, 12 जुलै 2018

पेणमधून परदेशात 12 हजार गणेशमूर्ती रवाना
पेण - गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असल्याने बाप्पाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमधील मूर्तींच्या कारखान्यांत लगबग वाढली आहे. या वर्षी तब्बल 30 लाख गणेशमूर्ती येथून देशभरातील भाविकांच्या घरी पोचणार आहेत; तर इंग्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आदी देशांत 12 हजार मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.

रंगसंगतीमुळे आकर्षण
डोळ्यांची सुबक आखणी, आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येथील मूर्ती केवळ महारष्ट्रातच नव्हे; तर देशविदेशांतून मागणी वाढत आहे. पूर्वी पेण शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्‍यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिर्की या परिसरांतही गणेशमूर्ती तयार करणारे सुमारे 500 पेक्षा अधिक लहान मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांमधून दरवर्षी जवळपास 15 ते 20 लाख गणेशमूर्ती तयार होतात.

निर्मितीमधील अडचणी
- डोळ्यांची आखणी करणाऱ्या कुशल कामगारांची कमतरता
- मूर्तीच्या किमतीत यंदा 30 टक्के वाढ
- प्लॅस्टरच्या मूर्ती तयार करण्याकडे कल

पेणमधील व्यवसाय
30 लाख गणेशमूर्ती तयार
12 हजार परदेशात रवाना
500 कारखाने
60 कोटी रु. वार्षिक उलाढाल
30 टक्के किमतीत वाढ

Web Title: 30 lakh ganpati murti ready in pen