आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये

CEO ला ५० हजार रुपयांची लाच घेताना अटक
आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये

मुंबई: घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी देण्याकरता ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आरे दुग्ध वसाहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (aarey ceo) नथु राठोड (nathu rathod) यांना अटक केली आहे. त्यांच्या घराची सोमवारी झडती घेतली असता पालापाचोळ्याच्या कच-यासोबत ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत बेहिशोबी रक्कम सापडली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता तीन कोटी ४६ लाख रुपये असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(एसीबी) (ACB) सांगण्यात आले आहे. याप्रकरणी खुल्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर असंपदेचाही आणखी एक गुन्हा दाख होऊ शकतो. (3.5 crore rupees found in aarey ceo home)

५० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राठोड यांच्या घरी शोध मोहिम राबवण्यात आली. त्यात घरातील बेड, घराच्या मागच्या बाजूला व टेरेसवरील कच-याच्या पिशवीसोबत ठेवण्यात आलेल्या प्लास्टीकच्या पिशवीत ही रोख रक्कम सापडली आहे. एसीबीने यासाठी राठोड यांचे घर पिंजून काढले होते. बेडच्या खाली, टेरेसवर कच-याच्या पिशवीसोबत सापडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यात व घराच्या मागच्या बाजूला छोट्या बागेसारख्या भागात पिशव्यांमध्ये मिळून तीन कोटी ४६ लाख १० हजार रुपये सापडले आहेत.

आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये
'झिंगाट गाण्यावर डान्स करणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई करा'

पाचशे व दोन हजार रुपयांच्या या नोटा आहेत. याप्रकरणी आता खुली चौकशी करण्यात येणार आहे. त्यात असंपदेबाबत तथ्य आढळल्यास याप्रकरणी असंपदेचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे अधिका-याने सांगितले. दरम्यान ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान यापूर्वी तक्रारदार यांचे आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे घर असून सदर घराची दुरूस्तीकरीता परवानगी मिळण्यासाठी नथु राठोड, मुख्य कार्यकारी अधिकरी ( (आरे) दुग्ध वसाहत, गोरेगाव पूर्व, मुंबई तथा उप आयुक्त प्रशासन (अतिरिक्त कार्यभार), वरळी दुग्ध डेअरी यांची भेट घेतली असता त्यांनी आरेचा शिपाई अरविंद तिवारी याची भेट घेण्यास सांगितले.

आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये
पदोन्नतीमधील आरक्षणासाठी काँग्रेस आक्रमक

तक्रारदार यांनी अरविंद तिवारी यांची भेट घेतली असता त्यांनी नथु राठोड याचे वतीने तक्रादाराकडे या कामाकरीता ५० हजार इतक्या लाचेची रक्कम मागणी केली. फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १४ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष येवून लेखी तक्रार दिली.

१९ मेला फिर्यादी यांना नथु राठोड यांच्या वरळी दुग्ध डेअरी येथील कार्यालयात भेटण्यास पाठवून तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता नथु राठोड यांनी फिर्यादी यांना पुन्हा अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार २४ मे रोजी फिर्यादी यांना राठोड यांच्या आरे दुग्ध डेअरी गोरेगाव कार्यालयात शिपाई अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास पाठवून पडताळणी केली असता राठोड यांच्या वतीने तिवारीने ५० हजार इतक्या रक्कमेच्या लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले.

त्यावरून सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान शिपाई अरविंद तिवारी यांनी फिर्यादी यांच्याकडून लाचेची रक्क्म ५० हजार स्वीकारून फिर्यादी यांना नथु राठोड यांच्या समक्ष हजर करून त्याची सहमती घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com