मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली ! कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

आरोग्य यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे.

मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला असून, तब्बल 324 नवे रुग्ण सापडले. आणखी 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 204 झाली आहे. आरोग्य यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याने चिंता वाढली आहे.

नक्की वाचा :  उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

मुंबईत आणखी 324 कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने रुग्णांची संख्या 5194 झाली. रविवारी 263 रुग्ण आढळले, तर 61 रुग्ण 22 व 23 एप्रिलला रुग्णालयांत दाखल झाले होते. 13 मृतांपैकी 9 जणांना दीर्घकालीन आजार होते, तर 4 जणांचा मृत्यू वार्धक्याशी संबंधित कारणांमुळे झाल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये 8 पुरुष व 5 महिलांचा समावेश होता. मुंबईतील मृतांचा आकडा 204 वर गेला आहे. एकूण 328 नवे संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 8292 संशयित रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. 

मोठी बातमी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

कोरोनाबाधितांप्रमाणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. रविवारी 135 जणांना रुग्णालयांतून घरी पाठवण्यात आले. बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 897 झाली आहे. घरी पाठवण्यात आलेल्या जणांपैकी 95 व्यक्ती मुंबईबाहेरून उपचारांसाठी आले होते.
 

324 new corona patients in Mumbai Anxiety over rising numbers; Death of 13 victims


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 324 new corona patients in Mumbai Anxiety over rising numbers; Death of 13 victims