
Bhoisar Latest News: वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेचा परिपूर्ण आराखडा तयार झाला आहे. या पाणीपुरवठा योजना प्रकल्पाचा खर्च ३२८ कोटी असून, त्याला महाराष्ट्र जीवन प्रधिकरणामार्फत मान्यता देण्यात आली आहे.
डहाणू तालुक्यातील वाढवणसमोरील समुद्रात हरित वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळ व जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण यांच्या भागीदारीतून हे बंदर उभे राहत आहे.