महाड तालुक्याला दिलासा; रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

महाड तालुक्यांतील बिरवाडी आणि शेलटोली या गावांमध्ये पंधरा दिवसापूर्वी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कामध्ये अनेकजण आले होते. संपर्कात आलेल्या 33 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.

महाड : महाड तालुक्यांतील बिरवाडी आणि शेलटोली या गावांमध्ये पंधरा दिवसापूर्वी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कामध्ये अनेकजण आले होते. संपर्कात आलेल्या 33 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल बुधवारी (ता. 14) निगेटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य आधिकारी डॉ.एजाज बिरादार यांनी दिली.

मोठी बातमी ः कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन अत्यवस्थ; पर्यटकांच्या संख्येत 80 टक्क्यांची घट? 

महाड तालुक्यांमध्ये बिरवाडी, शेलटोली आणि कोकरे या तीन गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर तालुक्यांमध्ये सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते. बिरवाडीमध्ये मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित महिलेच्या नातेवाईकांचा तपासणी अहवाल काही दिवसापूर्वी निगेटिव्ह आला. या मुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर शेलटोली येथील रुग्णाच्या संपर्कामध्ये शहरांतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी अधिकारी संपर्कामध्ये आले होते. 

मोठी बातमी ः नवी मुंबईकरांना दिलासा; रुग्णवाहिकेची समस्या सुटणार

या रुग्णाला मुंबईमध्ये उपचाराकरीता पाठविण्यात आले. त्यावेळी संपर्कामध्ये आलेल्या सर्वाची तपासणी करण्यात आली. या सर्वाचे अहवाल बुधवारी निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. यामुळे महाडमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 33 corona reports came negative which are in contact with covid posotive