esakal | 'झिंगाट डान्स करणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई करा'
sakal

बोलून बातमी शोधा

'झिंगाट गाण्यावर डान्स करणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई करा'

'झिंगाट गाण्यावर डान्स करणाऱ्या रोहित पवारांवर कारवाई करा'

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मुंबई: कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांचा कोविंड सेंटरमधील (covid center) झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांच्या या डान्सवर भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी टीका केली आहे. (Take action against rohit pawar for dancing at covid center ashish shelar)

"रोहित पवार यांनी किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी कोरोनाचा प्रसार होईल असे वागू नये. एक मंत्री लोकांना गोळा करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, एका नेत्याने घरी लग्न आणि पार्टी करण्यासाठी लोक गोळा केले त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. आता रोहित पवार असे वागले असतील तर शासनाने त्यांच्यावर करवाई करावी" असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: तसं घडलं तर आम्ही नक्कीच पेढे वाटू- संजय राऊत

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून अरबी समुद्रात बुडालेल्या P 305 बार्जच्या मुद्यावरुन आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न कोणते मंत्री करत आहेत. केंद्र सरकारने चौकशी समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल येण्याआधीच केवळ कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?" असा सवाल शेलारांनी विचारला.

हेही वाचा: 'मोदी कंगनाला भेटू शकतात, पण संभाजी राजेंना का नाही?'

"मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम चालू आहे. कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हा नाही. जो हजर नाही आपली बाजू मांडू शकत नाही त्याच्यावर गुन्हा दखल केला. हा डाव कुठल्या मजल्यावर शिजला हे मुख्यमंत्री सांगावे?" असे शेलार म्हणाले. १०-११ च्या बाबतीत जीआर निघणार आहे. या सरकारला स्वतःचे मत नाही. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने फटकरल्यावर परीक्षा घेतल्या अशी टीका शेलार यांनी केली.