esakal | मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 379 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 379 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (Corona new patients) आकडा काहीसा कमी झाला असून आज 379 नवीन रुग्णांची नोंद झाली. रविवारी 496 रुग्ण आढळले होते. तर आज दिवसभरात मृतांचा (corona deaths) आकडा वाढला असून  2 वरून 5 वर गेला आहे. मृतांचा एकूण आकडा 15,998 वर पोहोचला आहे.

हेही वाचा: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार- स्मृती इराणी

आज नोंद झालेल्या मृतांपैकी चौघांना दिर्घकालीन आजार होते. 3 मयत पुरुष तर 2 मयत महिला होत्या. मृतांपैकी 2 रुग्णाचे वय 40 ते 60 वयोगटाच्या दरम्यान होते तर 3 रुग्णाचे वय 60 वयोगटाच्या वर होते. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,46,725 वर पोहोचली आहे. तर दरम्यान, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असून 417 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,24,494 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या 3,771 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान आज 31,577 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.15 टक्के इतका आहे. आतापर्यंत 94,65,536 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1290 दिवस असा आहे.

loading image
go to top