esakal | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार- स्मृती इराणी
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Irani

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार- स्मृती इराणी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या (Anganwadi Employees) मागण्या (demands fulfillment) लवकरच पूर्ण होणार असल्याने सध्या कर्मचाऱ्यांकडून आनंद (happiness) व्यक्त करण्यात येत आहे. मागण्यांबाबत झालेल्या चर्चेनंतर महिला व बालविकास खात्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा: शंभर किलोमीटरचे सायकलिंग; नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी उपक्रम

अनेक दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित होत्या. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास खात्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी मुंबईत आल्यानंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने त्यांची भेट घेतली. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.शासकीय कर्मचारीचा दर्जा देणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेंशन योजना लागु करणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देणे, मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविका येवढे मानधन,  लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराचा रकमेत दुप्पट वाढ करणे, निर्दोष व मराठी पोषण ट्रॅकर अॅप देणे तसेच निकृष्ट शासकीय मोबाईल संबंधित मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटनेकडून विनंती करण्यात आली. मात्र केंद्रीय मंत्री यांनी मोबाईलची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट केले.

loading image
go to top