कोरोनाचा हाहाकार! मुंबईतील 381 ठिकाणे सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा हाहाकार! मुंबईतील 381 ठिकाणे सील

शहरातील 381 ठिकाणे आतापर्यंत सील करण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्रॅंट रोड, मलबार हिल परिसरातील 50 ठिकाणे आहेत. वरळी-प्रभादेवी सील केलेल्या 15 ठिकाणांत वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळी, पोलिस वसाहत, जिजामाता नगर अशा मोठ्या वसाहतींचा समावेश आहे. त्यामुळे वरळीचा निम्म्यापेक्षा अधिक भाग सील करण्यात आला आहे. 

कोरोनाचा हाहाकार! मुंबईतील 381 ठिकाणे सील

मुंबई : शहरातील 381 ठिकाणे आतापर्यंत सील करण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्रॅंट रोड, मलबार हिल परिसरातील 50 ठिकाणे आहेत. वरळी-प्रभादेवी सील केलेल्या 15 ठिकाणांत वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळी, पोलिस वसाहत, जिजामाता नगर अशा मोठ्या वसाहतींचा समावेश आहे. त्यामुळे वरळीचा निम्म्यापेक्षा अधिक भाग सील करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचली का? आव्हाडांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा; राष्ट्रवादीची मागणी

शहरातील खासगी रुग्णालयांत आलेल्या रुग्णांमुळे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सात रुग्णालयांसह दोन नर्सिंग होम सील करण्यात आली आहेत. दोन रुग्णालयांच्या कर्मचारी वसाहती सील करण्यात आल्या आहेत. वरळी पोलिस कॅम्पही सील करण्यात आला आहे. वरळीत बुधवारी एका दिवसात कोरोनाचे 55 रुग्ण आढळले. त्यामुळे बीडीडी चाळींचा परिसर सील करण्यात आला. कोरोनाचा एक रुग्ण आढळला, तरी तो परिसर सील करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. डी प्रभागात 50, के पश्‍चिम प्रभागातील 41 आणि ई प्रभागातील 34 ठिकाणे सील करण्यात आली आहेत. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांना प्रवेशबंदी! रायगडच्या सागरी सीमा बंद

ही रुग्णालये सील 

 • जसलोक (पेडर रोड) 
 • ब्रीच कॅंडी (कंबाला हिल) 
 • भाटिया (ताडदेव) 
 • वोक्‍हार्ट (मुंबई सेंट्रल) 
 • हिंदुजा (खार) 
 • स्पंदन (मुलुंड) 
 • प्रार्थना (गोरेगाव) 
 • शांती नर्सिंग होम (वांद्रे) 
 • अनुराधा नर्सिंग होम (मालाड पश्‍चिम) 
 • जसलोक नर्सिंग क्वार्टर्स 
 • जगजीवनराम क्वार्टर्स (ग्रॅंट रोड) 

  ही बातमी वाचली का? सारखी शिंक येतीये कोरोना तर नाही ना

विभाग सील केलेली ठिकाणे 

 • डी - ग्रॅंट रोड, मलबार हिल 50 
 • के पश्‍चिम - अंधेरी पश्‍चिम 41 
 • ई - भायखळा, माझगाव 34 
 • एस - भांडूप 33 
 • एम पूर्व - चेंबूर 24 
 • एम पश्‍चिम - मानखुर्द, गोवंडी 24 
 • पी उत्तर - मालाड, गोरेगाव पश्‍चिम 23 
 • जी उत्तर - दादर पश्‍चिम ते धारावी 21 
 • के पूर्व - अंधेरी पूर्व 19 
 • एल - कुर्ला 18 
 • एन - घाटकोपर 16 
 • जी दक्षिण - वरळी, प्रभादेवी 15 
 • एच पश्‍चिम - वांद्रे ते खार पश्‍चिम 14 
 • एफ दक्षिण - लालबाग, परळ 13 
 • आर दक्षिण - कांदिवली 13 
 • आर मध्य - बोरिवली 11 
 • एच पूर्व - वांद्रे ते खार पूर्व 9 
 • पी उत्तर - मालाड, गोरेगाव पूर्व 9 
 • सी - काळबादेवी 8 
 • एफ उत्तर - दादर पश्‍चिम ते शीव 5 
 • आर उत्तर - दहिसर 5 
 • टी - मुलुंड 3 
 • बी - मोहम्मद अली रोड 3 
 • ए - फोर्ट 3
loading image
go to top