सारखी शिंक येतेय कोरोना तर नाहीना?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

मनोविकार तज्ज्ञ डॉ.सागर मुंदडा याबद्दल सांगतात,' कोरोनामुळे नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.

मुंबई - कोरोनाची धास्ती जगभरात वाढतेय.या अनेकांना कदाचित असे अनुभव किंवा विचार डोक्यात येऊ शकतात की,  आमच्याा बाजूच्या इमारतीत कोरोनाचा संशयीत रुग्ण सापडला होता. त्यांने ज्या हवेत श्वास घेतलाय त्यात हवेत आम्ही श्वास घेतलाय. आम्हाला कोरोना तर होणार नाही ना? सारखी शिंक येतेय कोरोना तर नाहीना? असे अनेक प्रश्न नागरिकांना सध्या पडत आहेत. कारण कोरोनाची प्रचंड दहशत जगभरात निर्माण झाली आहे.

मनोविकार तज्ज्ञ डॉ.सागर मुंदडा याबद्दल सांगतात,' कोरोनामुळे नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.काहींना तर श्वास घेतल्यानेही कोरोना होईल अशी भिती वाटत आहे. कोरोनाच्या भितीचे कॉल्स वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोठी बातमी - महाराष्ट्रात सरकार विरुद्ध राज्यपाल असा नवा संघर्ष सुरू होण्याचे संकेत

केईएम रुग्णालयातील मानोसपचार विभागाच्या प्रमुख डॉ.शुभांगी पारकर यांनीही कोरोना मुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. कोरोना म्हटल्यावर लोकांना मृत्युच समोर दिसतोय. शिंक आली नाक चोंदले तरी लोकांना कोरोना झाल्याचे वाटत आहे.एका नोकरदार महिलेला शिंका येत होत्या त्यामुळे कोरोना झाल्याच्या भितीने तीची झोप उडाली होती.असेही डॉ.पारकर यांनी सांगितले.

सर्वत्र कोरोनाची चर्चा आहे. त्यामुळे ही भिती निर्माण झाली आहे. मुंबई सारखे शहर दहा दिवस बंद राहिल्याने ही भिती अधिकचंं वाढली असल्याची शक्यता मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करतायत.

what psychologist think about peoples behaviour and thinking in corona crisis

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what psychologist think about peoples behaviour and thinking in corona crisis