
मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासी सुविधा देण्याची जबाबदारी एसटीवर देण्यात आली होती.
मुंबई - कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावतांना एसटी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागन झाली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 3654 कर्मचारी कोरोना बाधीत झाले असून, त्यापैकी उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या 3166 आहे. मात्र, 98 कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला असून, तब्बल 390 कर्मचारी अद्यापही कोरोनाशी लढा देत आहे.
मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मार्च महिन्यात सुरू झालेल्या कोरोनाच्या माहामारीचा परिणाम अद्याप दिसून येत आहे. मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासी सुविधा देण्याची जबाबदारी एसटीवर देण्यात आली होती. त्याप्रमाणे राज्यातील विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना मुंबईत कर्तव्यावर बोलविण्यात आले होते. दरम्यान कर्तव्य बजावतांना एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागन झाली आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांनाचा कर्तव्यावरच मृत्यु झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे.
सध्या कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त बाधीत कर्मचारी बीड येथील 84 कर्मचारी आहे. त्याप्रमाणेच सातारा 38, नाशिक 30, ठाणे 30, परभणी 29, सिंधुदूर्ग 27 कर्मचारी बाधीत आहे. तर दैनंदिन एसटी कर्मचाऱ्यांची बाधीत कर्मचाऱ्यांची आकडेवारी वाढत असून, 13 ते 14 डिसेंबर या दोन दिवसात राज्यात 20 कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहे.
'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही'; नाना पटोलेंनी सरकारला फटकारले
सर्वाधिक मृत्यु ठाणे विभागातील
कोरोनाने बाधीत होऊन कर्तव्यावर आणि बाधीत होऊन उपचार घेतांना ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्युची संख्या सर्वाधीक 11 आहे. त्याप्रमाणेच पुणे 8, सांगली 8, नाशिक 7, जळगांव 7, अहमदनगर 6, कोल्हापूर 6, मुंबई 7, सातारा 5, धुळे 4, औरंगाबाद 5, नागपूर 4, रत्नागीरी 3, सोलापूर 3, उस्मानाबाद 3, पालघर 2, रायगड 2, अकोला 2, बुलढाणा 2, परभणी 1
390 ST employees in the state continue to fight Corona virus
-------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे)