चिंताजनक ! नवी मुंबईतील 'ही' चार ठिकाणं ठरतायेत कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

या चार भागांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे.

वाशी : मुंबईबरोबरच नवी मुंबईही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. नवी मुंबईत सोमवारी (ता. 22) दिवसभरात 120 नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सध्या शहरातील बाधितांचा आकडा 4 हजार 961 वर पोहोचला आहे. तर, आत्तापर्यंत 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाची बातमी : ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द

नवी मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नवी मुंबईत सोमवारी 120 रुग्ण आढळले आहे. नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे आणि ऐरोली हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या चार भागांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे.

महत्वाची बातमी : आता केवळ १ हजार ते ३ हजार रुपयांत मिळणार भाड्याचं घर...

दिवसभरात 62 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण 2 हजार 850 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

4 area in navi mumbai become a Corona's hotspot


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 area in navi mumbai become a Corona's hotspot