मद्यपान करताय? पण 8 दिवस थांबा! आहे 'ड्राय डे'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

ऑक्‍टोबर महिन्यात दसरा-दिवाळी हे दोन सण आहेत. या दिवसांत अनेकजण बाहेर पार्टी, नाईट आऊट करण्याचा विचार असेल आणि ऑक्‍टोबर महिन्यात मद्यप्राशन करण्याची योजना असेल तर प्लॅनिंग पूर्वी थोडे थांबा...

मुंबई : ऑक्‍टोबर महिन्यात दसरा-दिवाळी हे दोन सण आहेत. या दिवसांत अनेकजण बाहेर पार्टी, नाईट आऊट करण्याचा विचार असेल आणि ऑक्‍टोबर महिन्यात मद्यप्राशन करण्याची योजना असेल तर प्लॅनिंग पूर्वी थोडे थांबा...कारण येत्या ऑक्‍टोबर महिन्यात तब्बल 8 दिवस 'ड्राय डे' आहेत. त्यामुळे राज्यभरातील तळीरामांना सेलिब्रेशनदरम्यान त्रास सहन करावा लागणार आहे.

ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला ड्राय डे बुधवारी 2 ऑक्‍टोबरला आहे. गांधी जंयती असल्याने या दिवशी विदेशी मद्य, देशी दारू, ताडीची दुकाने बंद राहणार आहेत. लगेचच दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी 8 ऑक्‍टोबरला दसरा असल्याने मद्य विक्रीची दुकाने बंद असतील. रविवारी 13 ऑक्‍टोबरलाही वाल्मिकी जयंती असल्याने दारुची दुकाने बंद आहेत. सोमवारी 21 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीचे राज्यात मतदान होणार आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदानाच्या दिवशी आणि त्यापूर्वी 48 तास मद्यविक्रीस मनाई असते. त्यामुळे शनिवार 19 ऑक्‍टोबर, रविवार 20 ऑक्‍टोबर आणि सोमवार 21 ऑक्‍टोबरला राज्यात मद्यविक्री होणार नाही.

अजित पवारांसह 'ईडी'कडून 71 जणांवर गुन्हा दाखल

पुन्हा गुरुवारी 24 ऑक्‍टोबर 2019 रोजी मतमोजणी असल्याने, त्या दिवशीही दारु विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी 27 ऑक्‍टोबरला नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन असल्याने विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने बंद आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 days Dry Day in October Month Mumbai