
Maharashtra Railway News: मध्य रेल्वेवर सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) हरवलेल्या मुलांची घरवापसी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरपीएफने 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते मोहिमे' अंतर्गत एकूण ४१४ मुलांनं त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवले आहे. या मुलांमध्ये ३०६ मुले आणि १०८ मुलींचा समावेश आहे.