Raigad : सात महिन्यांत ४२० बालके कुपोषणमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

malnutrition

सात महिन्यांत ४२० बालके कुपोषणमुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार नियमितपणे बालकांचे सर्वेक्षण करून, कुपोषित बालकांच्या आहारासोबत त्यांना इतर वैद्यकीय उपचार वेळीच देण्यात आले. त्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ४२० बालके कुपोषणमुक्त झाली.

पुरेसा व योग्य आहार न घेतल्याने बालकांमध्ये अशक्तपणा निर्माण होतो. त्यामुळे कुपोषित बालके सापडण्याची भीती अधिक असते. रायगड जिल्ह्यातील आदिवासी व अन्य दुर्गम भागातील बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने कंबर कसली असून वेगवेगळ्या योजनांद्वारे कुपोषित बालकांवर वेळेवर उपचार करणे, त्यांना योग्य आहार देणे याकडे लक्ष देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मोहीम राबवण्यात आली.

मोहिमेत जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये आढळलेल्या कुपोषित बालकांना पोषण आहार देऊन त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती गीता जाधव, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर आदी मान्यवर या मोहीमेवर लक्ष ठेवून होते.

loading image
go to top