रविवारपासून कल्याणमध्ये  44 वे महानगर साहित्य संमेलन 

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जानेवारी 2019

कल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील महाजनवाडी सभागृहात पार पडणार आहे. येत्या रविवारपासून (ता. 20) या संमेलनाला सुरुवात होणार असून, याचे उद्‌घाटन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या आजच्या काळात तरुण पिढी काय आणि कशा प्रकारे वाचन करते, या विषयावर या संमेलनात विचारमंथन होणार आहे. 

मुंबई आणि उपनगरात साहित्य प्रसार आणि प्रचार व्हावा, त्याचा जागर व्हावा यासाठी महानगर साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. मुंबई मराठी साहित्य संघाच्या या साहित्य संमेलनाला 43 वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी ठाणे, पनवेल, नवी मुंबई या परिसरात महानगर साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा संमेलनाचे हे 44वे वर्ष असून, ज्येष्ठ कवयित्री आणि कथालेखिका नीरजा या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

तरुण पिढीच्या वाचनावर प्रकाश
आजच्या काळात समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. त्यामुळे या काळातील तरुण पिढी नेमके कशा प्रकारचे वाचन करते, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या संमेलनातील परिसंवादातून करण्यात येणार आहे. या परिसंवादात श्रीराम शिधये, प्रा. वीणा सानेकर, प्रा. दीपा ठाणेकर, कल्याण शहरातील उदयोन्मुख कथाकार प्रणव सखदेव आपले विचार मांडणार आहेत. डॉ. अनंत देशमुख या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. कविवर्य ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "असा जोगिया रंगे' हा विशेष कार्यक्रम संमेलनात सादर होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 44th Mahanagar Sahitya Sammelan at Kalyan on Sunday