

Global Spotlight on Vasai: 452-Year-Old Church Bags UNESCO Award
esakal
-संदीप पंडित
विरार: वसईला सामाजिक ,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संस्कृती लाभली आहे. याच संस्कृतीचा आता जगात डंका वाजू लागला आहे. वसईतील पापडी येथील प्रतिष्ठित अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी २०२५ च्या युनेस्को आशिया-पॅसिफिक मेरिट पुरस्काराने (UNESCO Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation 2025) सन्मानित करण्यात आले आहे. २० फेब्रुवारीला बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार भारतात फक्त वसईतील चर्चला मिळाला आहे.