औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातीप्रकरणी 48 लाखाचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातीप्रकरणी 48 लाखाचा साठा जप्त

मुंबई | औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातीप्रकरणी 48 लाखाचा साठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कारवाईचा बडगा उगारून ही औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती करणे सुरूच आहे. अन्न व औषध विभागाने अशा जाहिरात कंपन्यांवर पुन्हा एकदा कारवाई करून 48 लाखांचा साठा जप्त केला आहे. "मायफेअर क्रिम" उत्पादक मे. झी लॅबरोटरीज लि.पोआंटा माहिव हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेवलवर "अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर त्वचेचा रंग उजाळने अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आले होते.

अशा प्रकारची जाहिरात करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1900 व नियम यातील नियम 106 व अनुसुची 'जे' (J) में उदघन करणारे ठरत त्यामुळे प्रशांत आस्वार व रासकर, औषध निरीक्षक, ठाणे यांनी भिवंडी येथील गोडावूनवर छापा मारला. त्यात वरील आक्षेपार्ह मजकूर असलेल्या "मायफेअर क्रिम" या औषधाचा एकूण 10 लाखाचा साठा जप्त केला.तर दुसरा छापा नागपूर येथे महेश चौधरी, औषध निरीक्षक यांनी मारला. येथे ही सुमारे 34 लाखाचा औषधी साठा जप्त केला. याबाबत पुढील तपास चालू आहे.

हेही वाचा: जळगाव : सावधान, कोरोना अद्याप गेलेला नाही

औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 यांच्या तरतुदीचे उल्लंघन करणारे जाहिराती प्रसिध्द करु नये, असे प्रशासनाने कळविले आहे. औषधाच्या बाबतीत आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक1800222365 वर संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top