'या' ५ गोष्टी देतायेत अशुभ संकेत; महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थिती होतेय अधिक बिकट?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

आतापर्यंत देशात २१४० जण कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांना डिशचार्ज देण्यात आला आहे. हा आकडा देशातल्या एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या १२.३ टक्के आहे.

मुंबई : जगातल्या इतर देशांप्रमाणेच भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. भारतात आतापर्यंत १७ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही रुग्णांना डिशचार्ज देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र आणि गुजरात या दोन मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत चालली आहे त्यामुळे स्थिती बिकट होत चालली आहे. आतापर्यंत देशात २१४० जण कोरोनातून बरे झाले आहेत आणि त्यांना डिशचार्ज देण्यात आला आहे. हा आकडा देशातल्या एकूण कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या १२.३ टक्के आहे. मात्र गुजरात,महाराष्ट्र,दिल्ली आणि उत्तर प्रदेश  यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत चालले आहेत.

मोठी बातमी - शिक्षकाचा दावा, गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं कोरोनाचं औषध...
 

या गोष्टी देतायेत अशुभ संकेत:

  1. काल म्हणजेच रविवार देशात कोरोनाचे नवीन तब्बल १६१२ रुग्ण आढळले आहेत तर शनिवारी हा आकडा १२६६ इतका होता.
  2. दिवसागणिक कदेशात कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल १० टक्क्यांनी वाढतोय,आतापर्यंत देशात तब्बल १७००० च्या वर कोरोनाग्रस्त आहेत.
  3. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४००० च्या वर पोहोचला आहे तर दिल्लीत ३००० पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आहेत.
  4. देशातल्या एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्र आणि दिल्लीत ३६ टक्के रुग्ण आहेत.
  5. देशात आतापर्यंत ५६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी -  "समुद्रातील मासे खाऊ नका, कारण कोरोनाचे मृतदेह फेकले जातायत समुद्रात !" काय आहे सत्य असत्य...

देशात रविवारी ३९ रुग्णांचा मृत्यू:

देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे तसाच कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढत चाललं आहे. रविवार देशात तब्बल ३९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला तर गुजरातमध्ये १०, मध्य प्रदेशमध्ये ५, तेलंगणा ३ आणि केरळ, दिल्ली, राजस्थानमध्ये २-२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद केली गेली.

मुंबईत रविवारी कोरोनाचे नवे ४५६ रुग्ण  सापडले तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत फार मोठा आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

5 bad signs things in maharashtra and gujrat are not on right track read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 bad signs things in maharashtra and gujrat are not on right track read full story