esakal | अन् मजुरांनी धूम ठोकली
sakal

बोलून बातमी शोधा

निवास केंद्रातून पाच मजुरांचा पळ

लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील परप्रांतीय मजुरांनी पायीच आपले मूळ गाव गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पायी जाणाऱ्या 92 मजुरांसाठी खोपोली पोलिस व महसूल विभागाकडून जनता विद्यालयात त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली; मात्र त्यापैकी पाच मजुरांनी मंगळवारी (ता. 14) पळ काढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

अन् मजुरांनी धूम ठोकली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खोपोली (बातमीदार) : लॉकडाऊनमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील परप्रांतीय मजुरांनी पायीच आपले मूळ गाव गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. पायी जाणाऱ्या 92 मजुरांसाठी खोपोली पोलिस व महसूल विभागाकडून जनता विद्यालयात त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली; मात्र त्यापैकी पाच मजुरांनी मंगळवारी (ता. 14) पळ काढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

या व्यवस्थेची दैनंदिन पाहणीची जबाबदारी तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्यावर होती. जनता विद्यालयात तेलंगणा, कर्नाटक, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आदी भागांतील एकूण 92 मजूर होते. 14 तारखेनंतर आपल्याला गावी जाता येईल, या आशेवर हे मजूर होते; मात्र दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाल्यावर अजून पुढील 20 दिवस अशाच प्रकारे येथे राहावे लागेल, या चिंतेने मजुरांना ग्रासले आहे. याच चिंतेतून 15 व 16 एप्रिलच्या दरम्यान येथील पाच मजूर पळून गेल्याचे उघड झाले आहे. 

सावधान.... गाडी घेऊन बाजारात जाताय? दंड होईल!

मजूर निवासी केंद्रात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, दैनंदिन आरोग्य तपासणी, नाश्‍ता-चहासह दोन वेळचे पोटभर जेवण देण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जात आहे. यासाठी महसूल विभागाचा एक अधिकारी, नगरपालिकाचे दोन शिक्षक, एक शिपाई यांची विशेष निवड करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी ... ‘ते’ सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास

उपपोलिस अधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार इरेश चप्पलवार, मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याकडून दररोज अहवाल व पाहणी होत असूनही, येथील पाच मजूर पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पोलिस यंत्रणा दोन दिवसांपासून पळून गेलेल्या मजुरांचा शोध घेत आहेत.