esakal | 'ते' सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास...
sakal

बोलून बातमी शोधा

'ते' सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास...

चीनच्या वूहान शहरापासून पसरत जाऊन हा व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांचा जीव घेतोय. या भयंकर व्हायरसचा संपूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला काही आठवड्यांच्या टप्प्यांमध्ये सांगणार आहोत.

'ते' सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या कोरोना व्हायरस संपूर्ण जगात थैमान घालतोय. लाखो लोकांना आपला जीव यामुळे गमवावा लागला आहे. संपूर्ण जगात सध्या लॉकडाऊनची परिस्थती आहे. चीनच्या वूहान शहरापासून पसरत जाऊन हा व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकांचा जीव घेतोय. मात्र या भयंकर व्हायरसचा संपूर्ण प्रवास आम्ही तुम्हाला काही आठवड्यांच्या टप्प्यांमध्ये सांगणार आहोत.

पहिला आठवडा: २३ फेब्रुवारी ते १ मार्च :

फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना व्हायरस पूर्व आशिया खंडाच्या बाहेर पसरू लागला. या आठवड्यामध्ये पूर्व आशियाच्या बाहेर कोरोनाचे १०० पेक्षा जास्त रुग्ण नव्हते. मात्र त्यानंतर मध्य आशियातल्या इराणमध्ये आणि युरोपमधल्या इटली, फ्रांस आणि जर्मनीला आपल्या विळख्यात ओढलं. या आठवड्याच्या शेवटी चीनमध्ये कोरोनाचे तब्बल ८० हजार रुग्ण होते तर जगातल्या इतर देशांमध्ये हा आकडा १०० च्या वर पोहोचला होता.

मोठी बातमी आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणार कॅप्सूल बुथ! वाचा काय आहे संकल्पना
 

दुसरा आठवडा: २ मार्च ते ८ मार्च :

मार्च च्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरस संपूर्ण युरोप खंडात पसरला होता. इटली आणि जर्मनीनंतर स्पेनमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले होते. याच आठवड्यात अमेरिकेत १०० कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. तर चीन आणि युरोपमधल्या इतर देशांमध्ये हा आकडा दररोज शेकडोनं वाढत चालला होता.

तिसरा आठवडा: ९ मार्च ते १५ मार्च:

या आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अमेरिका आणि युरोपच्या बाहेर म्हणजेच कॅनडा, ब्राझील, इझ्राईल या देशांमध्ये वाढत गेला. युरोपच्या स्पेनमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगानं वाढू लागले. या आठवड्याच्या शेवटी स्पेनमध्ये कोरोनामुळे तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला होता.

चौथा आठवडा: १६ मार्च ते २२ मार्च:

या आठवड्यात भारतही इतर सर्व देशांप्रमाणे कोरोनाच्या भक्ष्यस्थानी पडला. भारतात या आठवड्यात १०० रुग्ण आढळले. तर इतर देशांमध्ये स्थिती अधिक बिकट होत चालली होती.

मोठी बातमी कसं समजेल सरकार तुमचे WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

पाचवा आठवडा: २३ मार्च ते २९ मार्च:

या आठवड्यात युरोप खंडात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला. मात्र अमेरीका आणि कॅनडा या दोन देशांमध्ये रुग्णांचा आकडा वाढू लागला. अमेरिकेत १ लाख २० हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण या आठवड्यात सापडले. त्यामुळे ट्रम्प यांनी आर्थिक मदत जाहीर केली.

सहावा आठवडा: ३० मार्च ते ६ एप्रिल:

या आठवड्यात जगातल्या सर्वच देशांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा प्रचंड वेगानं वाढत चालला होता. तर चीनमध्ये रुग्णांचा एकदा कमी होत चालला होता. या आठवड्याच्या शेवटी अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल ३ लाखांच्या वरती पोहोचला होता.

सातवा आठवडा: ७ एप्रिल ते १४ एप्रिल:

या आठवड्यात सर्वच मोठ्या आणि विकसित देशांमध्ये कोरोनाचे लाखो रुग्ण होते. भारतातही या आठवड्याच्या शेवट पर्यंत ५००० पेक्षा जास्त रुग्ण होते. तर यामुळे जगाची अर्थव्यवस्था ढासळत चालली होती.

recap of last seven week of corona virus read special article

loading image
go to top