भामट्या दलालांकडून तब्बल 5 लाखांची ई-तिकिटे जप्त; मध्य रेल्वेची धडक कारवाई 

कुलदीप घायवट
Friday, 15 January 2021

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या दलाल विरोधी पथकाने व रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी (ता.14) शिवडी आणि रे रोड येथे पाच तिकीट दलालांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार 216 ई-तिकिटे जप्त केली आहे.

 
मुंबई  : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या दलाल विरोधी पथकाने व रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी (ता.14) शिवडी आणि रे रोड येथे पाच तिकीट दलालांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार 216 ई-तिकिटे जप्त केली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये विशेष आणि उत्सव एक्‍सप्रेस चालविण्यात येत होत्या; मात्र या एक्‍सप्रेसच्या तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाण सुरु होता. त्यांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दलाने धडक कारवाई सुरू केली आहे. 

कारवाईदरम्यान आरोपी राजपाल जैन याच्याकडून 46 हजार 506 रुपयांची 31 तिकिटे, बाबूल मियान याच्याकडून 20 हजार 173 रुपयांची 10 तिकिटे, शरीफ पठाण आणि रिझान याच्याकडून 44 हजार 917 रुपयांची 25 तिकिटे, संजय गुप्ता याच्याकडून 1 हजार 620 रुपयांचे 1 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी लोकमान्य टिळक टर्मिनसच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 11 डिसेंबर 2020 रोजी रेल्वे पोलीस आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त तिकीट तपास अभियानांतर्गत 62 हजार 545 रुपयांची 68 ई तिकीट जप्त केले आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

23 डिसेंबर 2020 रोजी तपासणी अभियानात एका पथकाने 4 लाख 91 हजार 150 रुपयांच्या 273 ई तिकीट जप्त केली; तर आणखी एका पथकाने 89 हजार 832 रुपयांची 59 ई तिकीट जप्त केली होती. यामध्ये पकडण्यात आलेल्या तिकीट दलालांना पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. प्रवाशांनी अधिकृत रेल्वे तिकिटांवर प्रवास करावा किंवा www.irctc.co.in या संकेतस्थळावर रेल्वे तिकीट आरक्षित करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. 

5 lakh e tickets seized from crooks Central Railway strike action

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 lakh e tickets seized from crooks Central Railway strike action