esakal | मुंबई विमानतळावरुन विमान उड्डाणांची संख्या वाढणार, 'या' तारखेपासून होणार सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

take off.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या उड्डानाला मान्यता दिली असून देशांतर्गत विमानसेवा मर्यादीत प्रमाणात सुरू आहे. प्रत्यक्षात मुंबई विमानतळावरून दैनंदिन सुमारे 950 विमाने उडण्याची क्षमता आहे.

मुंबई विमानतळावरुन विमान उड्डाणांची संख्या वाढणार, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र 24 मे रोजी देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये 50 विमाने ये-जा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मंगळवार (ता.16)पासून 50 विमाने उडणार असून 100 विमाने ये-जा करणार आहे.

नक्की वाचा : एका कोरोनाबाधित डॉक्टरामुळे अख्खं गाव हदरलं!, 300 हून अधिक रुग्ण संपर्कात

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या उड्डानाला मान्यता दिली असून देशांतर्गत विमानसेवा मर्यादीत प्रमाणात सुरू आहे. प्रत्यक्षात मुंबई विमानतळावरून दैनंदिन सुमारे 950 विमाने उडण्याची क्षमता आहे. त्याप्रमाणे जास्तीत जास्त विमानांचे उड्डाण व्हावे, यासाठी केंद्राचा प्रयत्न होता. त्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी देशातील सर्व विमानतऴ प्रशासनाला सुरक्षेच्यादृष्ट्रीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि प्रवासी वाहतुकीचे आव्हान लक्षात घेता या विमानसेवेवर आक्षेप घेतला होता.

मोठी बातमीः सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो की....

टप्या टप्प्याने उड्डाणांची संख्या वाढवणार
सुरुवातीला 25 तर आता 50 विमान उडणार असल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली आहे. टप्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात प्रवासी विमान उड्डाणाची संख्या वाढवण्यात येणार आहे.

50 flights from Mumbai Airport will increase, starting from tomorrow