esakal | मुंबई, ठाण्यातील ५० रुग्णालये पेपरलेस
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई, ठाण्यातील ५० रुग्णालये पेपरलेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रुग्णालयात (Hospital) दाखल झाल्यापासून ते 'सुट्टी' मिळेपर्यंत एका रुग्णासाठी सुमारे पाऊणशे कागद खर्ची पडतात. त्यामुळे रोजच्या रोज दाखल होणाऱ्या हजारो रुग्णांच्या मागे किती कागद असतील लागत आणि त्यासाठी किती झाडांचा बळी जात असेल, याची कल्पना न केलेली बरी... याला पर्याय काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधत तीन तरुण उद्योजकांनी कागदी वैद्यकीय नोंदींना पर्याय ठरणारे अँप (App) विकसित केले.

'प्रेस्को पेपरलेस आयपीडी' ही प्रणाली वापरून ते ५० हून अधिक रुग्णालयांत कागदविरहित कामकाज करीत क्रम तोत्रे, भरत नरहरी आणि आनंद भानुशाली अशी या अवलियांची नावे आहेत. अमेरिकेहून मायदेशी परतल्यावर आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवण्याचा प्रवास त्यांनी सुरू केला. तब्बल चार वर्षे अथक मेहनत करून ठाण्याच्या विक्रम तोत्रे आणि मुंबईच्या भरत नरहरी व आनंद भानुशाली यांनी आपल्या 'न्यूरलविट्स' या कंपनीच्या माध्यमातून प्रेस्को पेपरलेस आयपीडी हे अँड्रॉईड अँप विकसित केले आहे. भारताच्या डिजिटल क्रांतीला हातभार लावत साकार केलेल्या या प्रणालीमुळे रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांची सर्व माहिती, त्याचे आजार व त्यावरील उपचार इथपासून त्याचे अहवाल आदी सर्व नोंदी कागदाचा वापर न करता अँड्रॉईड टॅबच्या माध्यमाने 'प्रेस्को' अँपचा वापर करून लिहून ठेवण्यास त्यामुळे मदत मिळत आहे.

हेही वाचा: पत्रव्यवहार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष;पाहा व्हिडिओ

करूनही अजून बरीचशी रुग्णालये रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी कागदावर करताना दिसतात. बऱ्याचदा या कामासाठी एका रुग्णामागे सुमारे पाऊणशे कागद लागतात. हे लक्षात आल्यावर आपल्याला आयुष्याचे ध्येय सापडल्याचे विक्रम आणि भरत यांनी सांगितले. कागदाप्रमाणे टॅबवर लिहून सर्व वैद्यकीय नोंदी डिजिटल स्वरूपात ठेवण्याचे कार्य भारतात प्रथम या प्रणालीद्वारे झाल्याचा दावाही विक्रम यांनी केला. रुग्णालयात रुग्णाची वैद्यकीय कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकारही होऊ शकतात; परंतु प्रेस्को प्रणालीमध्ये जतन केलेले सर्व मेडिकल रेकॉर्ड्स रुग्णालये वर्षानुवर्षे सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा प्राप्त करू शकतात. विशेष म्हणजे संगणकाचे अगदी अल्प ज्ञान असणारे कर्मचारी ते निष्णात डॉक्टर ही प्रणाली सहज वापरून एकही कागद न वापरता रुग्णालयाचा सर्व कारभार करू असे विक्रम भारताने डिजिटल क्रांतीची सुरुवात यांनी सांगितले.

loading image
go to top