50 लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक; मुंबईत पोलिसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drug

माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली

50 लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक; मुंबईत पोलिसांची कारवाई

मुबंई - मुंबईतील एमएचबी पोलिसांनी बोरिवली परिसरातून एका गर्भवती महिलेला 50 लाख 75 हजार किमतीच्या हेरॉईनसह रंगेहात पकडले आहे. मुस्कान दीपक कनोजिया असे आरोपी महिलेचे नाव असून ती २३ वर्षांची आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे. घटनेमुळे या परिसरात पोलिस तपासासाठी आणखी सतर्क झाले आहेत.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू, राज ठाकरेंची सभा रद्द होणार?

एमएचबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील सेंट फ्रान्सिस शाळेजवळ एक महिला ड्रग्ज पुरवण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली आहे. या अटकेनंतर महिलेची चौकशी केली असता, पोलिसांनी तिच्याकडून 345 ग्रॅम, 50 लाख 75 हजारांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. एमएचबी पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेसंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: 50 Lakh Rupees Drugs Found From Pregnant Women In Mumbai Borivali

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top