esakal | वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका; मांसाहारी प्राण्यांच्या नशिबी फ्रोजन मटण..
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

कोविडचा फटका आता पिजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांनाही बसत आहे. या श्‍वापदांना गेल्या काही महिन्यांपासून फ्रिज मधील मासांहारावर भुक भागवावी लागत आहे.

वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका; मांसाहारी प्राण्यांच्या नशिबी फ्रोजन मटण..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोविडचा फटका आता पिजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांनाही बसत आहे. या श्‍वापदांना गेल्या काही महिन्यांपासून फ्रिज मधील मासांहारावर भुक भागवावी लागत आहे. लॉकडाऊन मुळे ताजे मास मिळत नसल्याने प्राण्यांना फ्रोजन मासांहार दिला जात आहे.

राणीच्या बागेतील वाघ,बिबट्या,तरस आणि लांडग्याला मासांहार द्यावा लागतो.यात प्रामुख्याने बिफ(म्हैशीचे मांस) दिले जाते. तर कधी कधी कोंबड्यांचे मासंही दिले जाते. प्रामुख्याने ताजे मास या प्राण्यांना दिले जात होते. मात्र,आता ताजे मास मिळत नसल्याने या प्राण्यांना फ्रोजन मासांचा पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा: 'मुंबईत नालेसफाई की हात सफाई'; विरोधीपक्ष नेत्याचा पालिका आयुक्तांना सवाल..

दिवसाला 35 ते 40 किलो मास लागते.यात वाघाला मास बोनलेस असेल तर 5 ते 6 आणि हाडांसह असेल तर 10 ते 12 किलो लागतो.असे प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले. त्याच बरोबर या प्राण्यासाठी एक महिन्यांचे मास साठवता येईल अशी क्षमताही प्राणीसंग्रहालयात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राण्यांना खायला देण्यापुर्वी शितगृहातून मास काढून काही काळ ते गरम पाण्यात ठेवले जाते.त्यानंतरच प्राण्यांना मास खायला दिले जाते असेही त्यांनी सांगितले. या वर्षाच्या सुरवातीला औरंगाबाद येथून राणीबागेत वाघाची जोडी आणण्यात आली होती. ही जोडी आता मुंबईच्या वातावरणात रुळली आहे.

या प्राण्यांना फ्रोजन मांस देण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच ते प्राण्यांना देण्यापुर्वी योग्य काळजी घेतले जाते. तर,इतर शाकाहारी प्राण्याचे खाद्याही पुरेशा प्रमाणात आहे. प्राण्याचे अन्न हे अत्यावश्‍यक सेवेत असल्याने त्यांच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी आता डॉक्टरांचे विशेष पथक; आणखी एका पोलिसाचा मृत्यू.. 

पेंग्विनलाही फ्रिजची मासळी:

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या आहारात माशांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र,पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने त्यांना ताजे मासे मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांनाही फ्रोजन मासळी दिली जात आहे. दरवर्षीच पावसाळ्यात त्यांना फ्रोजन मासळी दिली जाते.

frozen meat is provide to tiger in mumbai zoo 

loading image
go to top