पोलिस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या 550 जागा रिक्त

सुचिता रहाटे
मंगळवार, 11 एप्रिल 2017

शासनाकडून मंजूर झालेल्या या पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) च्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली जाते. रिक्त राहिलेल्या जागांवर भरती व्हावी असे वारंवार शासनाला सांगूनही रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत.

मुंबई : पोलिस उपनिरीक्षकाच्या पदोन्नतीच्या 550 जागा सध्या महाराष्ट्रात रिक्त आहेत या जागांसाठी घेण्यात येणाऱ्या एमपीएससी परीक्षा अंतर्गत निवड झालेल्या पोलिस उपनिरीक्षक उमेदवाऱ्यांना नियुक्ती मिळते. रिक्त असणाऱ्या जागांसाठी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही हे अधिकारी सध्या प्रतीक्षा यादीवरच (वेटिंग लिस्ट) नियुक्त आहेत.

सन 1998 मध्ये नाशिक येथे घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत काही पोलिस उपनिरीक्षक अधिकारी उत्तीर्ण झाले. रिक्त झालेल्या पदांच्या भरतीसाठी अधिकाऱ्यांची निवड होऊनही या अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी वाट पाहावी लागत आहे. मेरिट मध्ये येऊन वर्षे होऊनही शासन पदोन्नती करत नसल्याचा आरोप या अधिकाऱ्यांकडून होत आहे.

शासनाकडून मंजूर झालेल्या या पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) च्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली जाते. रिक्त राहिलेल्या जागांवर भरती व्हावी असे वारंवार शासनाला सांगूनही रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक परीक्षेनंतर कट ऑफ लिस्ट जाहीर करावी, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मध्ये घेण्यात आला. परंतु प्रतीक्षा यादीतीलच जागा भरल्या गेल्या नसल्यामुळे पुढील लिस्ट काढल्या गेल्या नाहीत, त्यानुसारच एक वर्ष किंवा पुढील जाहिरात येईपर्यंत या प्रतीक्षा यादीची तरतूद व्हावी, असे असूनही शासनाकडून त्याची अंमलबजावणी करणात आली नाही, अशी तक्रार या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीतील अधिकाऱ्यांची वयोमर्यादाही संपत आहेत. याप्रकरणी गृहमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही आहे.

Web Title: 500 posts of police inspector vacant in maharashtra