धक्कादायक ! तुम्हा आम्हाला रात्रंदिवस बातम्या देणारे मुंबईतील ५१ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह ! - सूत्र

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार मुंबईतील कार्यरत असणाऱ्या एक दोन नव्हे तर 51 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत.

मुंबई - मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी. कारण आता पोलिस, डॉक्टर्स किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पत्रकारांना देखील कोरोनाची लागण झालेली पाहायला मिळतेय. महाराष्ट्र राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतील पत्रकारांच्या कोरोना टेस्ट करण्यात आलेल्या. धक्कादायक बाब म्हणजे यातील यातील अनेकांना कोरोना झाल्याचे आता समोर येतेय.

मोठी बातमी - "समुद्रातील मासे खाऊ नका, कारण कोरोनाचे मृतदेह फेकले जातायत समुद्रात !" काय आहे सत्य असत्य...

मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार मुंबईतील कार्यरत असणाऱ्या एक दोन नव्हे तर 51 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यापैकी काही पत्रकारांच्या कोरोना चाचण्यांचे निकाल येणं अद्याप बाकी आहे. नवी मुंबई विभागात कार्यरत पत्रकारांच्या देखील कोरोना चाचण्या करण्यात आल्यात, या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत अशी देखील माहिती समोर येतेय.  सदर माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येतेय. 

मोठी बातमी -  'या' ५ गोष्टी देतायेत अशुभ संकेत; महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थिती होतेय अधिक बिकट?

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीचा दिवस कडून बातम्या देणारे पत्रकार देखील आता कोरोनाच्या विळख्यात अडकताना पाहायला मिळतायत. मुंबई MMR भागातील पत्रकार, फोटोग्राफर, व्हिडिओ जर्नालिस्ट यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मुंबईत १६७ लोकांनी यावेळी कोरोना चाचणीत सहभाग घेतला होता. यातील  अनेक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती मुंबई महानगरपालिका किंवा सार्वजनिक आरोग्य खात्याकडून अद्याप आलेली नाही. 

51 journalist detected covid 19 positive many reports awaited read full coverage


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 journalist detected covid 19 positive many reports awaited read full coverage