esakal | राज्यातील 58 पोलिसांना राष्ट्रपती पदक; 14 जणांना शौर्यपद; 5 जणांचा उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील 58 पोलिसांना राष्ट्रपती पदक; 14 जणांना शौर्यपद; 5 जणांचा उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव

महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना उल्लेखनीय सेवेसाठी, 39 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर 14 जणांना शौर्य पदकाने स्वातंत्र्य दिनी गौरवण्यात येणार आहे. 

राज्यातील 58 पोलिसांना राष्ट्रपती पदक; 14 जणांना शौर्यपद; 5 जणांचा उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : महाराष्ट्रातील एकूण 58 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना उल्लेखनीय सेवेसाठी, 39 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर 14 जणांना शौर्य पदकाने स्वातंत्र्य दिनी गौरवण्यात येणार आहे. 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र नागरिकांची सेवा करणा-या, त्यांना संरक्षण देणा-या पोलिसांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरव करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. यात महाराष्ट्रातील पाच अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल, बिनतारी संदेश विभागाचे संचालक (पुणे) रितेश कुमार, एसीबी सुषमा चव्हाण (पुणे), पोलिस निरीक्षक विजय लोंढे (नाशिक), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश म्हेत्रास( सातारा) यांना विशेष सेवेसाठी गौरविण्यात येणार आहे.

मोठी बातमी - मृत्यूदर नियंत्रणासाठी 'ही' सुविधा ठरणार अत्यंत फायदेशीर, राज्यातील पहिला टेलीआयसीयु प्रकल्प भिवंडीत

त्याचप्रमाणे, गूणवत्तापुर्वक सेवेसाठी 39 जणांना पोलीस पदके जाहीर झाली. यामध्ये सहाय्यक पोलिस महानिरीक्षक विनायक देशमुख, पोलिस उपायुक्त शिरिष सरदेशपांडे, पोलिस अधिक्षक तुषार दोशी, पोलिस उपनिरीक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल यादव, सहाय्यक कमांडर सादीक अली नुसरत अली सईद, पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ (अंबरनाथ), पोलिस निरीक्षक केदारी पवार (मुंबई), वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालिनी शर्मा (चेंबुर), वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यकांत बांगर(ठाणे), सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भोसले(चेंबुर) यांचा समावेश आहे. तसेच, अन्य राज्यांसह केंद्रशासित प्रदेश, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या(एनसीबी) पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांचाही यात समावेश आहे.

मोठी बातमी -  मुंबईतल्या मृत्यूदरासंदर्भात समोर आली मोठी अपडेट, जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरुद्ध झुंज : 

राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदक हे गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलिस कर्मचा-यांना प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये मनिष गोरले, गोवर्धन वाढई, कैलास उसेंडी, कुमारशहा किंरगे, शिवलाल हिडको. सुरेश कोवेसी, रतिराम पोरेटी, प्रदीपकुमार गेडाम, राकेश नरोटे, राकेश हिचामी, वसंत तडवी, सुभाष उसेंडी, रामेश कोमोरे यांचा समावेश आहे.

( संकलन - सुमित बागुल )

58 police gets Presidential Medal for their outstanding services amid crucial period

loading image