कोरोनाच्या संकटकाळात मुंबई पालिकेवरील भार वाढला, तब्बल 'इतके' कोटी खर्च

पूजा विचारे
Sunday, 2 August 2020

कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५९८ कोटी रुपये खर्च झालेत.

मुंबईः गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्र राज्य कोरोना व्हायसरचा सामना करत आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक होता. शहराला कोरोनाचा जास्त फटका बसला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पालिकेनं विविध पातळीवर उपाययोजना आखल्या. याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या काळात मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील तब्बल ५९८ कोटी रुपये खर्च झालेत. कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांसाठी सेवा-सुविधा उभ्या करण्याबरोबरच बेघर, बेरोजगार उपाशीपोटी राहू नयेत यासाठी वितरित करण्यात आलेले अन्नपदार्थ आदींसाठी हे पैसे खर्च झाल्याचं समजतंय. 

या संकटकाळात पालिकेकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयांमधील सुविधांमध्ये वाढ केली. तसंच औषधांचा साठा, आवश्यक ती उपकरणेही उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर संशयित रुग्णांसाठी मुंबईत ३३८ ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली.  १७४ ठिकाणी कोरोना केअर सेंटर २ ची सुविधा पालिकेनं सुरु केली होती. त्यापैकी ६० केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीचे एनएससीआय मैदान, गोरेगावचे नेस्को, सोमय्या मैदान आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णांसाठी केंद्रे उभारण्यात आली. काही ठिकाणी प्राणवायूची, तर काही ठिकाणी अतिदक्षता विभागासारखी व्यवस्थाही करण्यात आली.

हेही वाचाः मुंबईकरांची यशाच्या दिशेनं वाटचाल, धारावीत उरले केवळ इतकेच अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबई पालिकेनं बेघर आणि बेरोजगार कामगारांना अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. सुमारे साडेतीन लाख व्यक्तींना दुपारी आणि रात्री जेवणाचा पुरवठा पालिकेकडून करण्यात येत होता. नगरसेवकांच्या मतदारसंघातही अन्नपदार्थ पाकिटे वाटली जात होती. आता बहुसंख्य परप्रांतीय मुंबईतून निघून गेल्यानं नोंद असलेले बेघर, बेरोजगारांनाच अन्न पाकिटांचे वाटप होत आहे.

मुंबई पालिकेचा अशा पद्धतीनं झाला खर्च

  • अन्नपदार्थ पाकीट-    ७३.८६
  • मध्यवर्ती खरेदी खाते- ११९.४८
  • यांत्रिकी आणि विद्युत विभाग- ६.६०
  • कार्यकारी आरोग्य अधिकारी-६३.१
  • सेवन हिल्स, विभागवार जम्बो सुविधा-   २५६.७४
  • मोठी रुग्णालये-    ४०.२१
  • विशेष रुग्णालये-  ९.९१
  • संलग्न रुग्णालये-   २८.६३
  • वैद्यकीय महाविद्यालये-  ०.०९

एकूण-    ५९८.८३  कोटी रुपये

598 crore expenditure Mumbai Municipal Corporation during Coronavirus period


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 598 crore expenditure Mumbai Municipal Corporation during Coronavirus period