
सुमित पाटील
पालघर : बोईसर शहरातील चित्रालय रस्त्याला जोडणारा सिडको बायपास रस्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शनिवारी (तारीख २३) रात्री आणि रविवारी पहाटे वेळी सिडको बायपास रस्त्यावरील काँक्रिट रस्त्यावर एकाच दिवशी ६ अपघात घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत १२ ते १३ बाईकस्वारांना किरकोळ दुखापत झाली असून या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.