esakal | कांदाभजी चाहत्यांसाठी खुशखबर; सुटलाय पुन्हा घमघमाट
sakal

बोलून बातमी शोधा

कांदाभजी चाहत्यांसाठी खुशखबर; सुटलाय पुन्हा घमघमाट

कांद्याचे दर बऱ्यापैकी आटोक्‍यात आल्याने तब्बल अडीच महिन्यांनंतर हॉटेलमध्ये कांदाभजीचा घमघमाट दरवळत आहे. हॉटेल्समधून गायब झालेली खमंग कांदाभजी उपलब्ध होऊ लागल्याने खवय्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

कांदाभजी चाहत्यांसाठी खुशखबर; सुटलाय पुन्हा घमघमाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कांद्याचे दर बऱ्यापैकी आटोक्‍यात आल्याने तब्बल अडीच महिन्यांनंतर हॉटेलमध्ये कांदाभजीचा घमघमाट दरवळत आहे. हॉटेल्समधून गायब झालेली खमंग कांदाभजी उपलब्ध होऊ लागल्याने खवय्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

ही बातमी वाचली का? नूतनीकरण होताच '...या' नाट्यगृहात पाय ठेवायला जागा नाही!

लांबलेला पावसाळा आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले होते. दोन महिन्यांपूर्वी कांद्याचा दर 150 रुपये किलोपर्यंत पोहचल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. हॉटेलमधून कांदा पूर्णतः हद्दपार झाला होता; तर गृहिणीचे घरखर्चाचे बजेट कोलमडले होते. समाज माध्यमांवर दोन-अडीच महिने कांदा दरवाढीवरील विनोद तुफान प्रसिद्ध होत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढू लागल्याने दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वीच्या दरापेक्षा सध्या घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दहापटींनी घसरण झाली आहे. बाजारात प्रतवारीनुसार कांद्याचे दर दहा ते वीस रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे दर पुन्हा पूर्वपदावर आल्याने हॉटेल्स आणि खाऊ गल्ल्यांमध्ये कांदा घालून केलेले पदार्थ उपलब्ध होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या कांदाभजीचा घमघमाट सर्वत्र दरवळू लागला आहे; तर पावभाजी, सॅलड, मिसळपावमध्ये कांदा पाहायला मिळत आहे. त्यामुळे हॉटेल चालक आणि खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 

ही बातमी वाचली का? हिंमत असेल तर वेगवेगळे लढून दाखवा!

खवय्यांची प्रतीक्षा संपली 
हॉटेलमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून कांदाभजीची मागणी होत होती. मात्र, दर आवाक्‍याबाहेर गेल्याने कांदाभजी बनवणे परवडत नव्हते. मात्र, आता दर कमी झाल्याने खवय्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. बेसन पीठाच्या दरात वाढ झाल्याने कांदाभजीच्या दरातही वाढ करावी लागणार असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे. 

कांदा महाग झाल्यामुळे हॉटेलमध्ये कांदाभजी मिळत नव्हती. पावभाजी, मिसळ पावमधून कांदा गायब झाला होता. त्यामुळे बाहेरील चविष्ट खाण्यामध्ये आनंद मिळत नव्हता. मात्र, आता हॉटेलमध्ये कांदा उपलब्ध होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. 
- प्रशांत बर्गे, नागरिक.