esakal | कोरोनामुळे कैद्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे कैद्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा सविस्तर
  • 601 कच्च्या कैद्यांची जामीनावर सुटका 
  • पुढील दोन टप्प्यातआणखी काही जणांना दिलासा 

कोरोनामुळे कैद्यांसाठी आनंदाची बातमी; वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोनाचा संसर्ग कारागृहातील कैद्यांना बसू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातील मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहातील कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया तुरुंग प्रशासनाने सुरु केली आहे. त्यानुसार तीन दिवसांत 601 कैद्यांची तात्पुरत्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आणखी काही जणांच्या जामीनाची कार्यवाही सुरु असून दोन टप्प्यामध्ये त्यांची सुटका करण्यात येणार आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यभरातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर तुरुंग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुरुंग प्रशासनाने कच्च्या कैद्यांना तात्पुर्ता जामीन देऊन त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तुरुंग प्रशासनाने शुक्रवारीपासून कच्च्या कैद्यांच्या सुटकेच्या कार्यवाहीला सुरुवात केली ाहे. गेल्या तीन दिवसांत 601 कच्च्या कैद्यांची सुटका केली आहे. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

येरवडा मध्यवर्ती कारागृह 51, सातारा जिल्हा कारागृह 12, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 8, कोल्हापुर जिल्हा कारागृह 15, सांगली जिल्हा कारागृह 6, सोलापूर जिल्हा कारागृह 10, अहमदनगर जिल्हा क ारागृह 2, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह 44, उस्मानाबाद जिल्हा कारागृह 5, परभणी जिल्हा कारागृह 22, बीड जिल्हा कारागृह 11, जालना जिल्हा कारागृह 7, धुळे जिल्हा कारागृह 24, मुंबई मध्यवर्ती कारागृह 68, ठाणे मध्यवर्ती कारागृह 13, तळोजा मध्यवर्ती कारागृह 1, भायखळा जिल्हा कारागृह 10, भायखळा महिला कारागृह 5, रत्नागिरी जिल्हा कारागृह 22, सावंतवाडी जिल्हा कारागृह 6, नागपूर मध्यवर्ती कारागृह 86, अमरावती मध्यवर्ती कारागृह 15, बुलढाणा जिल्हा कारागृह 8, अकोला जिल्हा कारागृह 9, वाशीम जिल्हा कारागृह 14, यवतमाळ जिल्हा कारागृह 33, वर्धा जिल्हा कारागृह 33, चंद्रपुर जिल्हा कारागृह 33 आणि भंडारा जिल्हा कारागृह 8 या कैद्यांचा समावेश आहे. 

 601 prisoners released on bail