Mumbai News : चैत्य भूमिवर आंबेडकरी समाजाची अफाट गर्दी

dadar chaityabhumi
dadar chaityabhumisakal

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्म दीक्षेला आज ६७ वर्षे उलटून गेले. या धम्मचक्र प्रवर्तन दिनी आज (ता.२४) दादरच्या चैत्यभूमीला अभिवादन करायला हजारो आंबेडकरी अनूयांयानी एकच गर्दी केली होती. या ठिकाणी पालिका, पोलिस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरला १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी लाखो अनुयायासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हा दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्य कार्यक्रम नागपूरच्या दिक्षा भूमीत होत असला तरी मुंबईच्या चैत्यभूमीत आंबेडकरी अनूयायी जमा होतात. आजचा दिवस खूप महत्वाता आहे. सकाळपासून आतापर्यंत १ लाखाच्या वर नागरिकांनी बाबासाहेबांच्या स्मृतीचे दर्शन घेतल्याची माहिती चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदिप कांबळे यांनी दिली. सकाळी ९.१५ ला संस्थेच्या अध्यक्ष दर्शना ताई भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला बौद्धभीक्षु संघ व भारतीय बौद्ध सभेचे राज्य आणि मुंबईतील पदाधिकारी हजर होते.

dadar chaityabhumi
Dasara Melava 2023 : ...तर आम्ही तुमचा शिवतीर्थावर सत्कार करू; राऊतांचे दसरा मेळाव्यात थेट अमित शाहांना आव्हान

पुस्तकांचा खप

चैत्यभूमीवर हजारो लोक जमले. त्यामुळे पुस्तकाला मोठी मागणी होत्याचे चैत्यभूमीवरुल पुस्तक विक्रेते अनिल खैरै सांगत होते. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान व बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेली पुस्तकांची चांगली विक्री झाल्याचे त्यांनी सांगीतले. यासोबत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा आणि मुर्तींचा १०० टक्के खप झाल्याचे विक्रेते सुरज शेलारांनी सांगीतले.

सायन रुग्णलयात मी लहान मुलाची डॉक्टर म्हणून काम करते. कामाच्या गडबडीतून वेळ काढून बाबासाहेबांपुढे नतमस्तक होण्यासाठी आज मी मुलांना घेवून आले आहे.

डॉ. सविता यादव, सायन रुग्णालय

मी ७० वर्षाची असून भाईंदरला राहते. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला मी चैत्यभूमीला बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येते. इथे मनाला खूप शांती मिळते.उर्जा मिळते

बेबीताई पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com