Dasara Melava 2023 : ...तर आम्ही तुमचा शिवतीर्थावर सत्कार करू; राऊतांचे दसरा मेळाव्यात थेट अमित शाहांना आव्हान

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत आहे.
Sanjay Raut Criticize PM Modi Amit Shah over CM Shinde Ajit Pawar corruption allegations dasara melava 2023
Sanjay Raut Criticize PM Modi Amit Shah over CM Shinde Ajit Pawar corruption allegations dasara melava 2023

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांचं जोरदार भाषण झालं. यामध्ये राऊतांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांसोबतच केंद्रातील मोदी सरकारवर देखील घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले.

संजय राऊत म्हणाले की, मागच्या वर्षी मी उपस्थित नव्हतो... तुरुंगात होतो, शंभर दिवस तुरुंगात राहिलो पण हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मोडला नाही, खचला नाही, तुटला नाही मनाने, माघार घेतली नाही. आम्हांला बाळासाहेबांनी घडवलंय. हा निखारा आहे, बाळासाहेबानी धगधगते निखारे निर्माण केले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोदी आणि भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार झाला आहे. मोदी दररोज म्हणात आहेत की, कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, मग काय करणार तर सगळ्यांना पकडून महाराष्ट्रात मंत्री बनवणार.. हा यांचा भारतीय जनता पक्ष. मला भाजपच्या नेत्यांच्या दुतोंडीपणाचं आश्चर्य वाटतं.

आता पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूका होत आहेत, या पाचही राज्यात भाजपचा दारुण पराभव होतोय, हे लिहून घ्या असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut Criticize PM Modi Amit Shah over CM Shinde Ajit Pawar corruption allegations dasara melava 2023
Uddhav Thackeray Dasara Melava : फडणवीसांनी माणसं संपवली, आता चंद्रकांत पाटलांच्या मागे लागले; सुषमा अंधारेंचा घणाघात

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर छत्तीसगडमध्ये अमित शाह म्हणाले की, जर छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आलं तर घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे लटकवू, अरे मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन काय करताय... सुरूवातच करायची आहे तर मग उलटं लटकवायला महाराष्ट्रातून सुरूवात करा असेही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने आलेलं एक सरकार तुम्ही सत्तेवर आणलं. ते 40 आमदार ५० कोटींचे खोके घेऊन शिवसेनेतून फुटले हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसत नाही. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवण्याची भाषा करताय तर आधी त्या 40 आमदारांना उलटं लटकवा, आम्ही तुमचा या शिवतीर्थावर सत्कार करू असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut Criticize PM Modi Amit Shah over CM Shinde Ajit Pawar corruption allegations dasara melava 2023
Nitin Banugade Patil Dasara Melava: "प्या बियर करा चियर असं महाराष्ट्र सरकारचे धोरण"; नितीन बानगुडे पाटलांचा आरोप

भ्रष्टाचाऱ्यांना म्हणे उलटं लटकवणार, यांच्या सरकारमध्ये अजित पवार आहेत. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि २५ हजार कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा केल्याचे पंतप्रधान मोदी सांगतात. मोदी भोपाळमध्ये सांगतात अजित पवारांना सोडणार नाही असं सांगतात आणि चार दिवसांनंतर अजित पवार महाराष्टाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com