नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्या दुचाकीचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. यामध्ये त्यांच्याकडून ६९ हजारांचा दंडही वसूल केला.
तुर्भे : कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर (Silencer) लावून वेगात वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर वाशी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून (Vashi Traffic Police) कारवाई करण्यात आली आहे. यात ६९ सायलेन्सर जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली. आवश्यक परवानगी घेऊन लवकरच ते नष्ट करण्यात येणार आहेत.