Mumbai अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri-East Election

शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

Mumbai : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या रिंगणात ७ उमेदवार

मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीत एकुण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपुष्टात आली. त्यानुसार ७ अर्ज स्विकारण्यात आले आहेत. तर ९ अर्ज मागे घेण्यात आले आहे. या ९ अर्जांमध्ये मुरजी पटेल यांच्या अर्जाचाही समावेश आहे.

तर याआधीच निवडणुक अधिकारी कार्यालयाकडून ९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आवाहनानंतर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला.

महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत अशी भूमिका घेत आम्ही अर्ज मागे घेत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. एकुण ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने येत्या ३ नोव्हेंबरला निवडणुकीची औपचारिकता होणार आहे.

निवडणुकीच्या मैदानातील उमेदवार

बाळा व्यंकटेश विनायक नाडर (आपकी अपनी पार्टी)

फरहाना सय्यद (अपक्ष)

राजेश त्रिपाठी (अपक्ष)

मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

ऋतुजा लटके (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे

नीना खेडेकर (अपक्ष)

मिलिंद कांबळे (अपक्ष)

अर्ज मागे घेतलेले उमेदवार

साकीब मलिक (अपक्ष)

निकोलस अल्मेड़ा (अपक्ष)

चंदन चतुर्वैदी (अपक्ष)

चंद्रकांत मोटे (अपक्ष)

मुरजी पटेल (भाजप)

पहल सिंह औजी (अपक्ष)

राकेश अरोरा (अपक्ष)