कोव्हिड संसर्गामध्ये 10 पैकी 7 मृत्यू हे इतर व्याधींमुळे; आरोग्य विभागाचा निष्कर्ष

भाग्यश्री भुवड
Sunday, 10 January 2021

राज्यात शनिवारी कोविडच्या मृतांचा आकडा 50 हजारांच्या वर गेला आहे. मात्र, यातील 50 टक्के मृत्यू हे कोविडसह इतर सहव्याधी असणाऱ्या रुग्णांचा झाला आहे.

मुंबई  : राज्यात शनिवारी कोविडच्या मृतांचा आकडा 50 हजारांच्या वर गेला आहे. मात्र, यातील 50 टक्के मृत्यू हे कोविडसह इतर सहव्याधी असणाऱ्या रुग्णांचा झाला आहे. राज्यातील 10 पैकी 7 जणांच्या मृत्यूंमध्ये कोविडसह इतर व्याधी होत्या. त्यातीलही अर्धे मृत्यू दोन गंभीर आणि उच्च जोखीम असलेल्या आजारांमुळे झाले आहेत असा निष्कर्ष आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणातून समोर आला आहे. 
कोविडला बळी पडलेल्यांपैकी 46.7 टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाब, तर, 39.4 टक्क्यांमध्ये मधुमेह होता. तर, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन गंभीर आणि उच्च जोखीमेचे आजार आहेत. त्यामुळे या अति जोखमीच्या आणि गंभीर रुग्णांना प्राध्यान्याने लसीकरण केले जाणार आहे. 

 

राज्यात आत्तापर्यंत 50,027 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यापैकी जास्तीत जास्त मृत्यू 60-69 या वयोगटातील लोकांमध्ये नोंदवण्यात आले आहेत. तर, प्रत्येक पाचव्या व्यक्तीचा मृत्यू पन्नाशी आणि सत्तरी पार केल्यामुळे झाला आहे. यात उच्चरक्तदाब सर्वाधिक सामान्य सहव्याधी (46.7 टक्के) आणि दुसरा प्रमुख आजार म्हणजे मधुमेह 39.4 टक्के एवढे प्रमाण आहे. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही दोन प्रमुख कारणे आहेत. तर, फक्त 11 टक्के लोकांना हृदयाचे विकार असल्याची नोंद करण्यात आली आहे.  भारताच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तर, भारत मृत्यूंच्या तुलनेत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. याचा अर्थ कोविडमुळे होणारा प्रत्येक तिसरा मृत्यू हा महाराष्ट्रात होत आहे.

 मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

70 टक्के पुरुषांचा मृत्यू 

कोविडमुळे एकूण झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हे पुरुषांचे झाले आहेत. मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण 69.8 टक्के म्हणजेच 34,499 एवढे मृत्यू झाले आहेत. दरम्यान, 30.2 टक्के महिलांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे, असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे. 
डॉ. आवटे यांनी सांगितले की, राज्यात आधी मृत्यूंचे प्रमाण जास्त होते. मात्र, गेल्या दोन महिन्यात या प्रमाणात लक्षणिय घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात मृत्यू दर 2 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

7 out of 10 deaths in covid infection are due to other disorders; Conclusions of the Department of Health

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 out of 10 deaths in covid infection are due to other disorders Conclusions of the Department of Health