70 हजार रुग्ण, 50 हजार क्वारंटाईन बेड्स; काय आहे मुंबई महापालिकेचं 'मिशन मे'...  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

मे महिन्याच्या अखेर पर्यंत मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 70 हजार पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेने 50 हजार क्वारंटाईन बेड्स तयार करण्यासाठी मैदाने ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे.

मुंबई : मे महिन्याच्या अखेर पर्यंत मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 70 हजार पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महापालिकेने 50 हजार क्वारंटाईन बेड्स तयार करण्यासाठी मैदाने ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. यात वानखेडे स्टेडियमही ताब्यात घेण्याचा विचार सुरु आहे. या 70 हजार रुग्णांपैकी 85 ते 90 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणांचे किंवा लक्षण विरहीत असतील. तर 3 हजार आयसीयू बेड्स लागण्याची शक्यता आहे. तर दिड हजारच्या आसपास व्हेंटिलेटरची तयारी महापालिकेने केली आहे.

मोफत देणार दररोज ५ GB डेटा; लॉक डाऊनमध्ये ग्राहकांना स्पेशल गिफ्ट

लक्षणं विरहीत रुग्णांना थेट रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसून त्यांना वैद्यकिय देखरेखी खाली क्वारंटाईन करण्यात येत आहे. हाजीअली येथील नॅशनल स्पोर्ट्स कॉम्पेक्स ऑफ इंडिया येथे 500 आयसोलेशेन बेड्स तयार करण्यात आले आहेत. तेथे 285 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णालयांची क्षमता वाढविणे त्याच बरोबर आयसीयू बेड्स तयार करणे यावरही पालिकेचा भर आहे.

कशी सुरु आहे तयारी आणि कुठे किती तयारी ?   

 • मुंबई सेंट्रल येथील नायर हे रुग्णालय कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आले असून सध्या तेथे 300 च्या आसपास खाटा असून ही क्षमता 1 हजार पर्यंत वाढविण्यात येईल.
 • कस्तुरबामध्ये 150 खाटा तर जोगेश्वरी ट्रॉमा केअरमध्ये 140 खाटा
 • मरोळच्या सेव्हन हिल्स मध्ये 1 हजार खाटांंची तयारी. 
 • राज्य सरकारचे जी.टी आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात 300 खाटा तयार करण्यात येणार.

Big Breaking - 'लीलावती'मधील प्लाझ्मा थेरपी यशस्वी, राजेश टोपे यांची माहिती

 • पालिकेच्या उपनगरीय तसेच खासगी रुग्णालयातही उपचारांची सोय.
 • सध्या 12 हजार क्वारंटाईन बेड तयार आहेत .
 • वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा विचार 
 • वांद्रे कुर्ला संकुलात 1 हजार खाटांचे क्वारंटाईन केंद्र गरजेनुसार हि क्षमता 5 हजार पर्यंंत नेणार 
 • गोरेगावच्या नेस्को मैदानात 1200 खांटांचे क्वारंटाईन केंद्र 1 हजार खाटांवर ऑक्सिजन सुविधा. गरज पडल्यास क्वारंटाईनची क्षमता 2 ते अडीज हजार पर्यंत नेणार .
 • 700 पालिका शाळांमध्ये 20 हजार व्यक्तींची सोय.
 • 500 खासगी अनुदानित शाळामध्ये 25 हजार व्यक्तीची सोय.
 • गरज पडल्यास खासगी शाळाही ताब्यात घेणार.

70 thousand patients 50 thousand quarantine beds BMCs mission may


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 thousand patients 50 thousand quarantine beds BMCs mission may