Big Breaking - 'लीलावती'मधील प्लाझ्मा थेरपी यशस्वी, राजेश टोपे यांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 29 April 2020

“लिलावती रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळाले आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे

मुंबई , ता. 29 : मुंबईमधील लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणूचा नवा 'A2a' अवतार समोर; येत्या काळात अधिक घातक ठरू शकतो कोरोना...

राजेश टोपे यांनी सांगितलं की, “लिलावती रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळाले आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांचे पालन केले तरच थेरपी यशस्वी होत असल्याचे मला सांगण्यात आले आहे. पुण्यातही हा प्रयोग करणे शक्य आहे”.

अत्यंत महत्त्वाचं :: सावधान ! 'ही' आहेत कोरोनाची नवी ६ लक्षणं... 

राज्यात प्रयोग करणारचं : 
केंद्र सरकारने राज्य सरकारला प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्याची परवानगी दिली आहे. आपण केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतोय, नियमानुसार आपण प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करीत असल्याने आपल्याला काहो अडचण येणार नाही. इतर राज्याचे माहीत नाही मात्र राज्यात आपण हा प्रयोग करणार असल्याचे ही टोपे म्हणाले.

first plasma therapy don in lilawati hospital is successful says rajesh tope


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first plasma therapy don in lilawati hospital is successful says rajesh tope