Crime News In Marathi | संतापजनक! सत्तरीच्या वृद्धाने केला १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धाने केला दहा वर्षाच्या बालिकेचा विनयभंग
संतापजनक! सत्तरीच्या वृद्धाने केला १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग

संतापजनक! सत्तरीच्या वृद्धाने केला १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग

मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांनी 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका 70 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मुलीने संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडित तरुणी एकाच परिसरात राहतात, आरोपी मुलीला आपल्या घरी बोलवत असे आणि चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवून मुलीला अयोग्यरित्या स्पर्श करत असे. शुक्रवारी पीडित मुलगी मानसिक तणावात दिसली. त्यावेळी घरच्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने हा सर्व प्रकार सांगितला

त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी जवळचे पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: 70 Year Old Man Harrassed 10 Year Old Girl Arresed By Mumbai Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top