Kabaddi Tournament : ७० वी अखिल भारतीय रेल्वे कबड्डीस्पर्धा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

70th All India Railway Kabaddi Tournament organized Railway Sports Ground in Paral mumbai

Kabaddi Tournament : ७० वी अखिल भारतीय रेल्वे कबड्डीस्पर्धा!

मुंबई : ७०वी अखिल भारतीय रेल्वे कबड्डी स्पर्धा परळ येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड मध्ये आयोजित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेतर्फे रेल्वे कबड्डी स्पर्धा २६ ते २९ डिसेंबर २०२२ या कालावधीत घेतली जात आहेत. ज्यामध्ये भारतीय रेल्वेचे १५ संघ सहभागी झाले आहे.

मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग यांनी २६ डिसेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, परळ येथे ७०व्या अखिल भारतीय रेल्वे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन केले. मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (सीआरएसए) द्वारे ४ दिवसीय चॅम्पियनशिप आयोजित केली आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे एकूण १५ संघ सहभागी होत आहेत. प्रो कबड्डी लीगचा भाग असलेले संपूर्ण भारतातील तब्बल ४८ खेळाडू या चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहेत.

या कार्यक्रमादरम्यान मध्य रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज शर्मा, (निर्माण), विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि विभागीय मुख्यालय व मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.