चिंतेचे सावट ! ठाणे जिल्ह्यात 24 तासांत 71 नवे रुग्ण, तर एकूण इतके कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून रविवारी (ता.26) एकाच दिवशी 71 नवीन रुग्णाची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून रविवारी (ता.26) एकाच दिवशी 71 नवीन रुग्णाची नोंद करण्यात आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 686 वर पोहोचला असून मृतांचा आकडा 20 वर गेला आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिकेत सर्वाधिक 20 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला. तर, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 17 रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय  कल्याण-डोंबिवलीत 12,  भिवंडीत २ तर अंबरनाथ,  बदलापूर आणि ठाणे ग्रामीण मध्ये प्रत्येकी 1 असे नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

हे वाचलं का ः लॉकडाऊनमध्ये प्रेग्नन्सीचा विचार करताय? आधी हे वाचा, मग काय ते ठरावा...

जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली,  नवी मुंबई  आणि मीरा भाईंदर या पालिका क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जास्त लोकसंख्या आणि दाटीवाटीच्या वस्त्या असल्याने या ठिकाणी धोका अधिक आहे. त्यात गेल्या अनेक दिवसापासून बाधित रुग्णांपासून बचावलेल्या भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीणमध्ये देखील रविवारी रुग्ण आढळून आल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 

महत्वाची बातमी ः रुग्णांचे निदान वाढवण्यासाठी गेम चेंजिंग ठरणार पल्स ऑक्सीमीटर

महापालिका क्षेत्र - आजची संख्या (कोरोनाबाधित) - एकूण 

  • ठाणे महापालिका - 17 - 226
  • कल्याण - डोंबिवली महापालिका - 12  - 129
  • नवी मुंबई महापालिका -  20 - 132 
  • मीरा भाईंदर महापालिका - 17 - 146
  • भिवंडी महापालिका - 02 - 11 
  • उल्हासनगर महापालिका - 00 - 02 
  • अंबरनाथ नगरपालिका - 01 - 05
  • बदलापूर नगरपालिका - 01 - 17
  • ठाणे ग्रामीण - 01- 18
  • एकूण - 71 - 86

 

71 new patients in 24 hours in Thane district Death of one; On the total number 686


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 71 new patients in 24 hours in Thane district Death of one; On the total number 686